Beed Municipal Council : राष्ट्रवादीच्या घड्याळाविरोधात बीड नगरपालिकेत कमळ-तुतारीची युती; सत्ताधाऱ्यांवर सर्वसाधारण सभा गुंडाळण्याची नामुष्की!

Beed politics News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये सभागृहात युती झाल्याचे चित्र पहायला मिळाले.
Beed Nagarpalika
Beed NagarpalikaSarkarnama
Published on
Updated on

नितीन चव्हाण

Beed Politics : बीड नगरपालिकेत सत्तांतर होऊन नवे कारभारी आले आहेत. परंतु केवळ बैठकांवर बैठका घेतल्या जात आहेत, बीडच्या जनतेच्या प्रश्नावर कुठलेच ठोस निर्णय होत नाहीत, अशी तोफ भाजपच्या गटनेत्या सारीका क्षीरसागर यांनी काही दिवसांपूर्वी डागली होती. त्याचा पुढचा अंक आजच्या सर्वसाधारण सभेत दिसला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये सभागृहात युती झाल्याचे चित्र पहायला मिळाले. विरोधकांची ही एकजूट पाहून नगराध्यक्षांवर सर्वसाधारण सभा गुंडाळण्याची नामुष्की ओढावली.

बीड शहराच्या विकासाचे स्वप्न पाहणारे आणि ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी झटणारे दिवंगत नेते अजित पवार यांचे स्वप्न धुळीस मिळवू नका, त्यांचे नाव खराब करू नका, असा हल्लाबोल भाजपाच्या गटनेत्या सारिका क्षीरसागर यांनी केला होता. रस्ते, पाणी, नालेसफाई, कचरा अशी कुठलीच मुलभूत कामे बीडमध्ये होताना दिसत नाहीयेत, अशी आगपाखडही त्यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेची सोमवारी होणारी सर्वसाधारण सभा वादळी होणार याचा अंदाज होताच, प्रत्यक्षात घडलेही तसेच.

Beed Nagarpalika
Maharashtra Political Live Update : अडकलेल्या कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी बचाव पथकाचे सर्व प्रयत्न सुरू

बीड नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षांच्या मनमानी, हुकूमशाही आणि अपारदर्शक कारभाराला चाप लावण्यासाठी बीडमधील दोन पारंपरिक राजकीय गट आक्रमक होत एकत्र आले. पालिकेतील भाजपाचे (योगेश क्षीरसागर समर्थक) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे म्हणजेच तुतारीचे (आमदार संदीप क्षीरसागर समर्थक) निवडून आलेले नगरसेवक सत्ताधाऱ्यांविरोधात एकाच व्यासपीठावर सरसावले होते. विरोधकांच्या या एकजुटीमुळे पालिकेची अत्यंत महत्त्वाची सर्वसाधारण सभा तहकूब करण्याची नामुष्की सत्ताधाऱ्यांवर ओढवली.

Beed Nagarpalika
Maharashtra News Live Update : एकनाथ शिंदेंनी बंडखोर खासदारांना तुडवा म्हणणाऱ्या संजय राऊतांना दिलं आव्हान

नगरपालिकेची ही सर्वसाधारण सभा सोमवारी (ता.13) सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या नोटीसवर एकूण 16 मुद्दे चर्चेसाठी ठेवण्यात आले होते. ज्यातील 7 मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होणार होती. मात्र, मागील बैठकांमध्ये मंजूर झालेल्या विकासकामांपैकी नेमकी कोणती कामे सुरू आहेत, किती कामे बोगस ठरली आणि कशाचे टेंडर काढले? याची कोणतीही अधिकृत वा लेखी माहिती नगरसेवकांना देण्यात आली नव्हती.

Beed Nagarpalika
Ambadas Danve : राजकारण लयं वंगाळ, सर्वसामान्य कार्यकर्त्याला सगळं सोडून शेती करावीशी वाटते; अंबादास दानवे मनातले बोलले!

​त्यासोबतच मागील सभेची प्रोसीडिंग कॉपी मिळण्याची कायदेशीर मागणी करूनही ती सत्ताधाऱ्यांनी न दिल्याने दोन्ही क्षीरसागर गटांचे नगरसेवक प्रचंड संतप्त झाले. जोपर्यंत विकासकामांची संपूर्ण माहिती समोर येत नाही, तोपर्यंत आम्ही कोणत्याही गोष्टीला मान्यता देणार नाही, अशी ठाम भूमिका घेत दोन्ही बाजूंनी सभा डोक्यावर घेण्यात आली. अखेर कायदेशीर कोंडी झाल्याने सत्ताधाऱ्यांना ही सभा रद्द करावी लागली. बीडच्या राजकीय इतिहासात सख्खे वैरी मानले जाणारे दोन्ही क्षीरसागर गट पालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात एकत्र आल्यामुळे सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या नव्या राजकीय समीकरणाची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.

Beed Nagarpalika
Ambadas Danve : राजकारण लयं वंगाळ, सर्वसामान्य कार्यकर्त्याला सगळं सोडून शेती करावीशी वाटते; अंबादास दानवे मनातले बोलले!

विरोधी पक्ष म्हणून जाब विचारत राहू

भाजपच्या गटनेत्या डॉ. सारिका क्षीरसागर यांनी पालिकेच्या प्रशासकीय कारभाराचे वाभाडे काढले. बीडच्या नागरिकांवर अपारदर्शक असलेले कोणतेही काम लादले जाऊ नये. प्रत्येक कामात शंभर टक्के पारदर्शकता हवी, हाच या विरोधकांच्या एकजुटीचा मुख्य उद्देश आहे. येत्या 7- 8 दिवसांत होणाऱ्या पुढील बैठकीत प्रशासन सर्व सविस्तर माहितीसह उपस्थित राहील. आम्ही आदर्श विरोधी पक्ष म्हणून प्रशासनाला आणि सत्ताधाऱ्यांना सतत जाब विचारत राहू, असा इशारा सारिका क्षीरसागर यांनी दिला.

Beed Nagarpalika
Beed Municipal Council : बीडसाठी अजित पवारांनी पाहिलेले स्वप्न धुळीस मिळवू नका, त्यांचे नाव खराब करू नका; भाजपच्या गटनेत्या राष्ट्रवादीच्या सत्ताधाऱ्यांवर संतापल्या!

तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते खुर्शीद आलम यांनी सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारावर जोरदार प्रहार केला. मागील बैठकांमध्ये मंजूर झालेल्या ठरावांची माहिती प्रशासनाने दडवून ठेवली आहे. स्वतःच्या मनाने किंवा हुकूमशाही पद्धतीने विषय मंजूर करण्याचे प्रकार आता थांबले पाहिजेत. बीड शहराच्या हितासाठी आणि पारदर्शक विकासकामांसाठी आम्ही (दोन्ही क्षीरसागर गट) एकत्र आलो आहोत. जनतेच्या हक्कासाठी आम्ही कोणासोबतही जाऊ, असेही खुर्शीद आलम यांनी स्पष्ट केले.

Beed Nagarpalika
NCP (SP) News : सुपारीबाज लोकांच्या कारभाराला कंटाळलो! बीडमध्ये शरद पवारांच्या जिल्हा सरचिटणीसाचा राजीनामा; बजरंगबाप्पावरही केले आरोप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com