Chandrakant Khaire  Sarkarnama
मराठवाडा

Shivsena Leader Chandrakant Khaire : लोकसभा निवडणुकीत पैसे नव्हते, गाफील राहिलो ; आता आदेश आला तर विधानसभा लढणार..

Chandrakant Khaire will contest the Assembly Election:पश्चिम विधानसभा मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवून कमबॅक करण्याची खैरे यांची तयारी सुरू होती. परंतु भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रेवश करवून अंबादास दानवे यांनी त्यांचा डाव उधळून लावला.

Jagdish Pansare

Shivsena UBT Politics News : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील सात मतदारसंघात महायुतीचे पानीपत झाले. लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगरात ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे विजयी होतील, असा अंदाज सगळ्याच सर्व्हेंमधून वर्तवण्यात आला होता. पण महायुतीचे संदीपान भुमरे निवडून आले. माझ्याकडे पैसे नव्हते, आम्ही गाफील राहिले आणि पक्षातीलच काहीजणांनी काम केले नाही, म्हणून पराभूत झालो.

आता उद्धव ठाकरेंनी आदेश दिला तर मी पश्चिममधून विधानसभा लढवायला तयार आहे, असे सांगत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी पुन्हा दंड थोपटले आहेत. सकाळ थेट संवाद कार्यक्रमात चंद्रकांत खैरे यांनी त्यांच्या पुढील राजकीय वाटचाल, लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून झालेला पैशाचा वापर, पक्षातील काही नेत्यांकडूनच झालेला दगाफटका यासह अनेक विषयांवर आपली भूमिका आक्रमकपणे मांडली.

लोकसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा झालेला पराभव चंद्रकांत खैरे यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. पश्चिम विधानसभा मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवून कमबॅक करण्याची खैरे यांची तयारी सुरू होती. परंतु भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रेवश करवून शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी त्यांचा डाव उधळल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात सुरू आहे.

राजू शिंदे यांचा प्रवेश आपल्याला विश्वासात न घेता झाला, असा आरोप करत खैरे यांनी पुन्हा एकदा अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्यावर अप्रत्यक्षरित्या बोट दाखवले. लोकसभा निवडणुकी दरम्यान, माझ्यावर विरोधकांनी संपती, चहा, काॅफीचे मळे, शेकडो एकर जमीन, कंपन्या असल्याचा दावा केला होता. तो नाकारत छोटी कंपनी सोडली तर माझ्याकडे काहीच नाही.

माझ्याकडे शेकडो एकर जमीन असल्याचा दावा करणाऱ्यांनी ती दाखवून द्यावी, मी बाॅन्डपेपरवर त्यांच्या नावावर करून द्यायला तयार आहे, असे सांगत खैरे यांनी विरोधकांना आव्हान दिले. लोकसभा निवडणुकीत मला पराभूत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचंड पैसा पाठवला, तत्कालीन पोलिस आयुक्त मनोज लोहिया, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी त्यांना साथ दिल्याचा खळबळजनक आरोप खैरे यांनी यावेळी केला.

आगामी विधानसभा निवडणुकीत सहा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही तयारी सुरू केली आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार यांना असलेली सहानुभूती याच्या जोरावर आम्ही महायुतीला धूळ चारू, असा विश्वास खैरे यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT