Kolhapur News: आगामी विधानसभा निवडणूक महायुती स्वतंत्र लढणार की एकत्र लढणार याबाबत अद्याप भूमिका जाहीर नाही. अशातच कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रत्येक इच्छुकांनी आपापली तयारी सुरू ठेवली आहे.
आगामी विधानसभा निवडणूक लढवायची आणि जिंकायची असे डावपेच आखून प्रत्येकाने निवडणुकीच्या तयारीला वेग धरला आहे. महायुतीचा निर्णय जो होईल तो होईल, असे गृहीत धरूनच अनेकांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.
अनेकांचा निर्णय महायुतीच्या निर्णयावर अवलंबून असल्याने त्यांनी आपले पत्ते खोललेले नाहीत. अशातच शिवसेना शिंदे गटाच्या (Shiv Sena)जिल्हाप्रमुखांनी विधानसभा निवडणुकीबाबत वक्तव्य करून कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील महायुती चांगलीच खळबळ उडवून दिली आहे.
शिरोळ तालुक्यातील शिवसेना शिंदेसेनेच्या सर्व पदाधिकांऱ्यांची बैठक जयसिंगपूर येथे झाली. त्यावेळी शिवसैनिकांनी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून जिल्हाप्रमुख रवींद्र माने (Ravindra Mane) यांनी निवडणूक लढवावी, जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात शिंदे सेनेचे उमेदवार आणि निवडणूक लढवावी, असा निर्धार करण्यात आला.
कोल्हापूर जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांपैकी हातकणंगलेच्या एका जागेवर धैर्यशील माने यांनी विजय मिळवला. त्यामुळे शिंदे सेनेच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आशा पल्लवीत झाल्या आहेत.
जयसिंगपूर येथे इचलकरंजी आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिकांचा मेळावा पार पडला. यावेळी जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी बोलताना, लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या दोन्हीं उमेदवारांनी चांगली कामगिरी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मैदानात उतरत नेत्यांना बळ दिले. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांचे हात बळकट करूया, आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व जागांवर निवडणूक लढवू, या असा निर्धार कार्यकर्त्यांसह रवींद्र माने यांनी केला.
निवडणुकीमध्ये खासदार धैर्यशील माने यांना मताधिक्य दिल्याबद्दल शिरोळ विधानसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून विधानसभा, नगरपालिका या निवडणुकांमध्ये सामान्य शिवसैनिकाला न्याय देण्याची प्रमुख भूमिका असेल, असे सांगितले.
आगामी विधानसभेत जास्तीत जास्त युवकांना संधी मिळावी. त्याची सुरूवात इचलकरंजी शहरातून करूया. इचलकरंजी मतदारसंघातून जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मेळाव्यात केली. आजचा मेळावा हा आगामी विधानसभा निवडणुकीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून कोणत्या जागा शिंदे गटासाठी पूरक आहेत याचे चाचपणी करण्यासाठी घेतला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.