Bhumre-Danve-Khaire News Sarkarnama
मराठवाडा

Shivsena UBT News : म्हणे, आमच्यात मतभेद नाहीत.. खैरे- दानवे यांच्यात दुरावा कायम!

The ongoing rift between senior Shiv Sena leaders Chandrakant Khaire and Ambadas Danve highlights the persistent internal factionalism within the party : चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवे यांच्यावर जाहीर आरोप करत त्यांची तक्रार थेट उद्धव ठाकरे यांच्याकडे मातोश्रीवर जाऊन केली होती.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील जिल्ह्यातील दोन बडे नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातील मतभेद मिटले आहेत, असे काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर झालेल्या बैठकीनंतर दोघांनीही जाहीर केले होते. सध्या संभाजीनगरात पाणी प्रश्नावरून सुरू असलेल्या 'लबाडांनो पाणी द्या' या आंदोलनातही हे दोघे हिरारीने सहभागी होत आहेत. मात्र दोघेही स्वतंत्रपणे वेगवेगळ्या भागात आंदोलन करताना दिसतात.

चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्यावर जाहीर आरोप करत त्यांची तक्रार थेट उद्धव ठाकरे यांच्याकडे मातोश्रीवर जाऊन केली होती. या बैठकीनंतर मात्र आमच्यात मतभेद नाहीत, उद्धव ठाकरे यांना त्रास होऊ नये यासाठी मी चार पावलं मागे आलो आहे. आता अंबादास दानवेंनी चार पावलं मागे यावे, अशी अपेक्षा खैरे यांनी व्यक्त केली होती. मुंबईत मातोश्रीवर झालेल्या या बैठकीनंतर जिल्ह्यात परतलेल्या या दोन्ही नेत्यांनी एकमेकांविरोधात काहीही न बोलण्याची, टीका न करण्याची भूमिका घेतली आहे.

परंतु दोघांमधील मतभेद मिटले हा त्यांचा दावा मात्र तितकासा खरा वाटत नाही. अजूनही खैरे- दानवे एकत्र येण्याचे टाळतात, एकत्र आलेच तर एकमेकांपासून अंतर राखून असतात हे वारंवार दिसून आले आहे. आज महाराष्ट्र दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये आयोजित शासकीय सोहळ्याला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जिल्ह्याचे खासदार संदिपान भुमरे आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) उपस्थित होते. या सोहळ्यात खैरे- दानवे यांची एकाच सोफ्यावर बसण्याची व्यवस्था केली होती.

तर शेजारच्या सोफ्यावर खासदार संदिपान भुमरे बसले होते. या फोटोकडे बघितल्यानंतर आमच्यात आता मतभेद नाही, असे सांगणारे हेच का ते खैरे- दानवे? असा प्रश्न निश्चितच पडतो. दोघांचीही तोंड विरुद्ध दिशेला आणि दोघांमधील 'अबोला' या छायाचित्रातून स्पष्ट दिसतो. तर हा प्रसंग कॅमेऱ्यात कैद करणाऱ्या फोटोग्राफरकडे खासदार संदिपान भुमरे मात्र स्मित हास्य करत पाहत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील खैरे- दानवे या नेत्यांवर खासदार संदिपान भुमरेही अनेक वेळा तोंडसुख घेताना दिसतात.

खैरे यांना जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी अनेकदा पक्षप्रवेशाची ऑफर दिली. तर दुसरीकडे भुमरे यांनी मात्र अस्तित्व संपलेले खैरे आमच्या पक्षात नको, असे म्हणत विरोध दर्शवला. भुमरे यांनी अंबादास दानवे यांच्यावरही टीका करताना ते कागदोपत्री नेते असल्याचे म्हटले होते. संभाजीनगर जिल्ह्यात शिवसेनेची वाट खैरे आणि दानवे यांनीच लावली, असा आरोपही भुमरे यांनी केला होता. असे असताना हे तीन नेते महाराष्ट्र दिनाच्या शासकीय कार्यक्रमात एकत्र आले, परंतु या तीनही नेत्यांमध्ये संवाद नव्हता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT