Sandipan Bhumre On Water Issue : आम्ही शेतकऱ्यांच्या जीवनात सुवर्णक्षण आणला! संभाजीनगरकांचे पाणी मात्र आंदोलन करणाऱ्या लबाडांनी पळवले

MP Sandipan Bhumre criticized the ongoing protest in Sambhajinagar : ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजने अंतर्गत मौजे तोंडोळी, गाडेगाव आणि लोहगाव या गावांतील सुमारे एक हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचा दावा भुमरे यांनी केला.
MP Sandipan Bhumre-MLA Vilas Bhumre Paithan News
MP Sandipan Bhumre-MLA Vilas Bhumre Paithan NewsSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : आजचा दिवस माझ्या जीवनात आणि आपल्या पैठण तालुक्यातील प्रत्येक शेतकरी बंधू-भगिनींच्या जीवनात एक सुवर्ण क्षण घेऊन आला आहे. ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना भाग एक, टप्पा दोन या आपल्या तालुक्याच्या विकासाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे भव्य लोकार्पण मौजे तोंडोळी येथे माझ्या शुभहस्ते संपन्न झाले. पण छत्रपती संभाजीनगरात मात्र जनतेचे पाणी पळवणारे लबाडच आंदोलन करत असल्याचा, टोला शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांनी लगावला.

ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजने अंतर्गत मौजे तोंडोळी, गाडेगाव आणि लोहगाव या गावांतील सुमारे एक हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचा दावा भुमरे (Sandipan Bhumre) यांनी केला. ही योजना म्हणजे आपल्या शेतकऱ्यांच्या हरित भविष्याची नांदी आहे. भरपूर पाणी उपलब्ध झाल्यामुळे पीक उत्पादनात वाढ होईल, नवे पीक प्रकार घेण्यास शेतकर्‍यांना प्रोत्साहन मिळेल आणि संपूर्ण परिसराचा आर्थिक स्तर उंचावेल, असा विश्वासही भुमरे यांनी व्यक्त केला.

पैठण (Paithan) तालुक्यातील सिंचन क्षेत्रात वाढ करण्याच्या दृष्टीने ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजना ही एक महत्वाकांक्षी योजना आहे. या तालुक्याचे वीस वर्ष प्रतिनिधित्व करणारे संदीपान भुमरे यांनी या योजनेसाठी पाठपुरावा केला होता. आता ते खासदार तर त्यांचे चिरंजीव विलास भुमरे हे पैठणचे आमदार आहेत. या दोघांनी मिळून या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण केले. हा सोहळा म्हणजे एका नव्या सुरुवातीचा प्रारंभ आहे.

MP Sandipan Bhumre-MLA Vilas Bhumre Paithan News
Sandipan Bhumre On Khaire-Danve : अंबादास दानवे कागदोपत्री नेते, तर खैरेंनी आता नातवंड सांभाळावीत! खासदार भुमरेंचा टोला

केवळ हा टप्पा नाही, तर उर्वरित योजनेचे काम देखील गतीने सुरू आहे आणि ते पूर्णत्वास नेण्यासाठी मी स्वतः कटिबद्ध आहे. वेळोवेळी संबंधित यंत्रणांसोबत संपर्क साधून, आवश्यक त्या अडचणी दूर करून, ही संपूर्ण योजना लवकरात लवकर पूर्ण करणे हे माझे सर्वोच्च ध्येय राहील. ही योजना म्हणजे केवळ पाणीपुरवठा नव्हे, तर शेतकऱ्यांच्या स्वप्नांना नवसंजीवनी देणारा प्रकल्प आहे. आपल्या पैठण तालुक्यात शेतीप्रधान अर्थव्यवस्थेचा नवा अध्याय लिहिला जाणार आहे, हरित क्रांतीची ही सुरुवात, असल्याचे भुमरे म्हणाले.

MP Sandipan Bhumre-MLA Vilas Bhumre Paithan News
Vilas Bhumre On Chandrakant Khaire : चंद्रकांत खैरे यांच्यासारख्या नास्तिक लोकांना घेऊन पक्ष बिघडवायचा नाही! भुमरे बाप-लेकाचा विरोध कायम!

योजनेच्या यशस्वीतेसाठी अथक मेहनत घेतलेल्या सर्व शासकीय अधिकाऱ्यांचे, अभियंत्यांचे, कर्मचारी वर्गाचे आणि विशेषतः प्रत्येक शेतकरी बांधवांचे भुमरे यांनी मनःपूर्वक आभार मानले. सगळ्यांच्या एकजुटीचेच फलित आज आपल्यासमोर आहे. आगामी काळातही आपल्या पैठण तालुक्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मी सर्वतोपरी प्रयत्नशील राहणार आहे. माझे स्वप्न आहे, एक असे पैठण घडवण्याचे जो हरित असेल, समृद्ध असेल आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू फुलवणारा असेल, अशी ग्वाही देखील भुमरे यांनी दिली.

MP Sandipan Bhumre-MLA Vilas Bhumre Paithan News
Water Issue In Sambhajinagar : पाणी प्रश्नाला अभंग अन् भारूडातून वाचा; शिवसेनेकडून रिकाम्या हंड्याची पालखी!

दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सुरु असलेल्या लबाडांनो पाणी द्या, आंदोलनाची भुमरे यांनी खिल्ली उडवली. ज्या लबाडांमुळे संभाजीनगरकरांवर आज ही वेळ आली, तेच लबाड आज आंदोलन करत आहे. संभाजीनगरला पाणी पुरवठा करणारी योजना आता पूर्ण होत आली आहे, लवकरच शहराला मुबलक पाणी मिळणार आहे, तरीही केवळ श्रेय लाटण्यासाठी लबाडांचे हे आंदोलन सुरू असल्याची टीका संदीपान भुमरे यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com