Chandrakant Khaire Reaction On Shivsena Logo News Sarkarnama
मराठवाडा

Chandrakant Khaire News : आम्हीच ओरिजनल शिवसेना , धनुष्यबाण आम्हालाच मिळाला पाहिजे! नाहीतर चिन्हच गोठवा, चंद्रकांत खैरेंची मागणी

Shivsena Leader Chandrakant Khaire Reaction : माझे एक लाख मतदान धनुष्यबाणाला म्हणजेच विरोधी उमेदवाराला गेले. अनेक मतदारांनी मला हे सांगितले. माझ्या छातीवर कायम धनुष्यबाण असायचा.

Jagdish Pansare

  1. उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी “आम्हीच मूळ शिवसेना” असा दावा केला आहे.

  2. त्यांनी मागणी केली आहे की धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरे गटालाच द्यावे, नाहीतर चिन्ह गोठवावे.

  3. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे दोन्ही गटांचे लक्ष

Shivsena UBT News : शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाला? याचा फैसला पुन्हा पुढे ढकलण्यात आला आहे. संपूर्ण राज्याचे आणि देशाचे लक्ष सुप्रीम कोर्टाच्या आजच्या सुनावणीकडे लागले होते? परंतु सुनावणी पुढे ढकलल्यामुळे काय होणार? याचा सस्पेंस कायमच राहिला. ओरिजनल शिवसेना आमची आहे, धनुष्यबाण आम्हालाचा मिळाला पाहिजे. अन्यथा हे चिन्हच गोठवा, अशी मागणी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.

सुप्रीम कोर्टातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर एबीपी माझा वृत्तवाहिनीला बोलताना चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेची (Shivsena) स्थापना आणि धनुष्यबाण चिन्हाचा राजकीय प्रवासच उलगडून सांगितला. सुप्रीम कोर्ट सर्वोच्च आहे, त्यांच्या निर्णयाचा आदरच आहे. परंतु पक्ष फोडून बाहेर गेलेल्यांना शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण दिला जाऊ नये. तो ओरिजनल म्हणजेच आमच्या शिवसेनेला मिळाला पाहिजे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 मध्ये शिवसेनेची स्थापना केली. प्रबोधनकार ठाकरेंनी त्याचा नारळ वाढवला, त्यांनीच शिवसेना हे नाव दिले. आम्ही सुरूवाताली धनुष्यबाण चिन्ह नव्हते तेव्हा वेगळ्या चिन्हावर निवडणुका लढलो. 1988 मध्ये छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीमध्ये धनुष्यबाण चिन्ह आम्हाला मिळाले. मी स्वतः याच चिन्हावर खासदार, आमदार झालो, असे चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) म्हणाले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत माझे एक लाख मतदान धनुष्यबाणाला म्हणजेच विरोधी उमेदवाराला गेले.

अनेक मतदारांनी मला हे सांगितले. माझ्या छातीवर कायम धनुष्यबाण असायचा. तेच चिन्ह समजून मतदारांनी मतदान केले, ज्यामुळे माझा पराभव झाला. मशाल चिन्हाच्या बाबतीतही निवडणूक आयोगाने ऐनवेळी केलेल्या बदलामुळे संभ्रम निर्माण झाला होता. पक्ष फोडणाऱ्यांना नाव आणि चिन्ह कसे मिळू शकते? हा प्रश्न सर्वसामान्यांनाही पडला आहे.

न्यायालय आम्हाला न्याय देईल ही अपेक्षा आहेच. जर निर्णय आमच्या विरोधात गेला तर पुढे काय करायचे? याचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे घेतील. पण माझा प्रामाणिक इच्छा आहे, मी देवाला आणि न्यायदेवतेलाही साकडं घालतो, आमची शिवसेनाच ओरिजनल पक्ष आहे, त्यामुळे धनुष्यबाणही आम्हालाच मिळाला पाहिजे.

जर असे झाले नाही तर तो कोणालाच देऊ नये, चिन्ह गोठवावे, अशी माझी मागणी असल्याचे खैरे म्हणाले. धनुष्यबणाची पूजा मातोश्रीत आजही केली जाते, असेही खैरे यांनी यावेळी सांगितले. धनुष्यबाण आणि शिवसेना नाव कोणाचे? यावर सुप्रीम कोर्टात आज अंतिम सुनावणी होणार होती. मात्र ती पुढे ढकलण्यात आली आहे.

1.चंद्रकांत खैरे यांनी नेमकी कोणती मागणी केली आहे?
त्यांनी धनुष्यबाण हे चिन्ह उद्धव ठाकरे गटालाच द्यावे, अन्यथा ते चिन्ह गोठवावे अशी मागणी केली आहे.

2. ही मागणी का केली गेली आहे?
कारण खैरे यांच्या मते उद्धव ठाकरे गटच मूळ शिवसेना आहे आणि तेच त्या चिन्हाचे खरे हक्कदार आहेत.

3. यावर शिंदे गटाची काय प्रतिक्रिया आहे?
शिंदे गटाकडून ही मागणी राजकीय दडपण म्हणून पाहिली जात असून त्यांनीही आपला दावा कायम ठेवला आहे.

4. सुप्रीम कोर्टाचा निर्णय कधी अपेक्षित आहे?
आज होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. लवकरच निर्णय येण्याची शक्यता आहे.

5. या प्रकरणाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो?
शिवसेनेतील गटबाजी अधिक तीव्र होऊन आगामी निवडणुकांवर त्याचा परिणाम दिसू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT