Chandrakant Khaire News, Nagpur Sarkarnama
मराठवाडा

Chandrakant Khaire News : खैरेंचा विदर्भ दौरा जोरात, बावनकुळे, अमित शहांवर हल्लाबोल..

Vidarbha News: अमित शहा यांचे नाव घेत थेट ईव्हीएम मशीन सॅटेलाईट द्वारे नियंत्रित केल्या जात असल्याचा गंभीर आरोप केला.

सरकारनामा ब्युरो

Marathwada : पक्षाचे नाव, चिन्ह गमावल्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आदेशानंतर नेत्यांचे महाराष्ट्रभर दौरे सुरू झाले आहेत. शिवगर्जनेच्या माध्यमातून ठाकरे गटाचे नेते भाजपवर तुटून पडले आहेत. मराठवाड्यातील ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर विदर्भातील पाच जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

२६ फेब्रुवारीपासून त्यांच्या दौऱ्याला सुरूवात झाली. नागपूरमध्ये पाय ठेवताच (Chandrakant Khaire) खैरेंनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना (Bjp) भाजपकडून कसे बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्यांची कशी घुसमट सुरू आहे, असे सांगत भाजपच्या अतंर्गत गटबाजीवर भाष्य करत खळबळ उडवून दिली.

त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे गटावर केलेल्या टीकेचाही समाचार घेतला. बावनकुळे यांनी ठाकरे गट उद्या एमआयएमसोबत देखील युती करेल अशी टीका केली होती. त्यावर खैरेंनी बावनकुळे यांनाही दम भरला होता. एवढेच नाही तर काल गडचिरोली येथे बोलतांना खैरेंनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे नाव घेत थेट ईव्हीएम मशीन सॅटेलाईट द्वारे नियंत्रित केल्या जात असल्याचा गंभीर आरोप केला.

अर्थात या आरोपानंतर खैरे सोशल मिडियावर ट्रोल देखील झाले. अमित शहा यांच्याकडून महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागा जिंकू असा दावा केला जातोय. या दाव्याचा संदर्भ देत खैरेंनी ईव्हीएम मशीनचा मुद्दा उपस्थितीत केला.

अमित शहा यांच्यावर आरोप करतांना ते एवढा छातीठोकपणे दावा कसा करू शकता हे स्पष्ट करतांना खैरेंनी थेट ईव्हीएम मशीन सॅटेलाईटद्वारे नियंत्रित केल्या जातात असा आरोप केला. त्यामुळे आता पुढच्या निवडणुका या ईव्हीएम ऐवजी बॅलेटवर घ्या, अशी मागणी देखील खैरेंनी केली. एकंदरित खैरे यांचा विदर्भ दौरा चांगलाच चर्चेत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT