Sandipan Bhumre News : ग्रामपंचायत निवडणुकीत फटका बसल्यानंतर आता नगरपरिषदेत भुमरेंची परीक्षा..

Paithan : गेल्या नगरपरिषेदत २३ पैकी शिवसेना ७, भाजप ५, राष्ट्रवादी ६, काॅंग्रेस ४, तर एक अपक्ष नगरसेवक निवडून आला होता.
Guardian Minister Sandipan Bhumre News
Guardian Minister Sandipan Bhumre NewsSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : राज्याचे रोहयो तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्या पैठण मतदारसंघातील नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचयात निवडणुकीत तालुक्यातील सर्वात मोठ्या बिडकीनमध्ये भुमरेच्या पॅनलला सपाटून मार खावा लागला होता. शिवाय त्यानंतर ठाकरे गट, राष्ट्रवादीने भुमरे यांच्याविरोधात रान उठवत त्यांच्या अडचणी वाढवल्या.

Guardian Minister Sandipan Bhumre News
Shivsena News: ठाकरे-शिंदेंकडून प्रतोदपदी दावा : चेंडू सभापतींच्या कोर्टात : बजोरिया की पोतनीस, कोणाची होणार निवड?

वाईनबारवरून झालेल्या टीकेला उत्तर देतांना भुमरे यांची फजिती झाली होती. परंतु आता हे सगळं बाजूला ठेवून पैठण (Paithan) नगरपरिषद शिवसेनेकडे राखण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. खरतर एखाद्या मंत्र्याला नगरपरिषदेवरील सत्ता राखणे तसे अवघड नसते, परंतु राज्यात (Shivsena) शिवसेनेत झालेले मोठे बंड, त्यानंतरचे सत्तांतर, गद्दारी आणि खोक्यांचे आरोप यामुळे मतदारांमध्ये असलेल्या रोषाचा फटका बसण्याची शक्यता असते.

गेल्या नगरपरिषदेत शिवसेना-भाजपची युती होती. आता देखील ती कायम राहणार? की मग स्वबळाचा नारा स्थानिक पातळीवर दोन्ही पक्ष देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. गेल्या ३० वर्षापासून नगरपरिषदेवर शिवसेना आणि भुमरेंचे वर्चस्व राहिले आहे. ते कायम ठेवण्यासाठी भुमरे आपली प्रतिष्ठा पणाला लावणार एवढे मात्र निश्चित.

गेल्या नगरपरिषेदत २३ पैकी शिवसेना ७, भाजप ५, राष्ट्रवादी ६, काॅंग्रेस ४, तर एक अपक्ष नगरसेवक निवडून आला होता. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असून बैठकांचे सत्र सुरू आहे. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भुमरे यांच्यावर निधी वाटपात अन्याय केल्याची तक्रार केली होती. अगदी उपमुख्यमंत्र्यांकडे ही तक्रार करणार असल्याचे सांगितले होते.

राज्यात शिवसेना-भाजप युती असली तरी स्थानिक पातळीवर या दोन्ही पक्षांचे संबंध कमालीचे ताणले गेलेले आहेत. त्यामुळे भुमरेंना भाजपकडूनच अधिक त्रास होण्याची शक्यता आहे. शिवाय ठाकरे गट, काॅंग्रेस-राष्ट्रवादीचे देखील मोठे आव्हान भुमरे यांच्यासमोर असणार आहे. निवडणूक कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नसला तरी जिल्हा परिषद निवडणुकांसोबतच नगरपरिषदेची देखील निवडणूक होवू शकते, ही शक्यता गृहित धरून राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com