Imtiaz Jalil-Chandrakant Khaire News Sarkarnama
मराठवाडा

Chandrakant Khaire News : नामांतराला विरोध आहे, तर मग न्यायालयात जा, आंदोलनाची नौटंकी कशाला ?

Aimim : इम्तियाज जलील यांनी नामांतरावर जनमत चाचणी घ्या, या आपल्या जुन्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे.

सरकरनामा ब्युरो

Shivsena : औरंगबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव असे नामांतर झाले आहे. केंद्राने देखील त्याला मंजुरी दिली आहे. सगळ्याच राजकीय पक्षांनी हे नाव स्वीकारले आहे. त्यामुळे एमआयएमचा (Aimim) जर या नामांतराला विरोध असले तर त्यांनी थेट न्यायालयात जावे. विनाकारण आंदोलन करून जनतेच्या मनात गैरसमज पसरवण्याचे काम करू नये, असा सल्ला ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी खासदार इम्तियाज जलील यांना दिला आहे.

नामांतरविरोधी आंदोलनामुळे शहारातील वातावरण चिघळत आहे. औरंगजेबाचे पोस्टर झळकावल्याने जनतेच्या मनात संताप आले, त्यामुळे अशा चिथावणीखोर आंदोलकांना आवरा, अशी मागणी खैरे (Chandrakant Khaire) यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेवून केली. त्यानंतर माध्यमांशी बोलातंना त्यांनी इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांचे आंदोलन म्हणजे नौटंकी असल्याचे म्हटले आहे.

खैरे म्हणाले, नामांतराचा निर्णय सगळ्याच राजकीय पक्षांनी स्वीकारला आहे. कुणीही त्याला विरोध केला नाही. पण एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील या विषयावरून राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचा जर नामांतराला विरोध असेल तर त्यांनी खुशाल न्यायालयात जावे, इथे रस्त्यावर बसून आंदोलनाची नौटंकी करू नये. त्यांच्या या आंदोलनाने लोकांच्या मनात गैरसमज पसरत आहे.

शिवाय आंदोलनात औरंगजेबाचे पोस्टर झळकवत केली जाणारी घोषणाबाजी यामुळे शांत असलेल्या शहरातील वातवरण बिघडवण्याचा प्रयत्न देखील काही लोकांकडून केला जातोय. त्याला वेळीच आवर घालण्याची जबाबदारी पोलिस प्रशासनाची आहे. ते हे काम निश्चितच करतील असा विश्वास देखील खैरे यांनी व्यक्त केला. दरम्यान, इम्तियाज जलील यांनी नामांतरावर जनमत चाचणी घ्या, या आपल्या जुन्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT