Maharashtra Assembly Session : ''तुम्ही जर आमच्यासोबत गुवाहाटीला..''; मंत्री सामंतांचा राष्ट्रवादीच्या आमदाराला टोला

Uday Samant & Prajakt Tanpure News : काही दिवसांपूर्वी मी त्यांचा राज्यमंत्री होतो आणि...
Uday Samant & Prajakt Tanpure News
Uday Samant & Prajakt Tanpure News Sarkarnama

Maharashtra Politics : राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या अर्थसंकल्पीय सत्राचा बुधवारी (दि.८) दुसरा आठवडा सुरू झाला. राज्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाच्या कामकाजाच्या सुरुवातीलाच विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत शिंदे फडणवीस सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी देखील पाहायला मिळाली. याचवेळी राहुरीचे माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांना उद्योगमंत्री उदय सामंतांनी मिश्किल टोला लगावला.

आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी विधानसभेच्या सभागृहात लक्षवेधी मांडली. यावेळी तनपुरे म्हणाले, काही दिवसांपूर्वी मी त्यांचा राज्यमंत्री होतो आणि मुख्यमंत्री महोदयांचा देखील राज्यमंत्री होतो. माझ्या मतदारसंघातील शहरालगत असणाऱ्या ग्रामपंचायतींना दिवसाआड तरी पाणी पुरवठा मिळावा, रोज घनकचरा उचलला जावा म्हणून एका नगरपालिकेची स्थापना केली. त्यावर माझी सही झाली नंतर मुख्यमंत्री महोदयांची सही झाली. पण मला माहीत नाही त्यावर काय झालं.

Uday Samant & Prajakt Tanpure News
Aaditya Thackeray : '' आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील आणि...'' ; रश्मी ठाकरेंना कुणी दिला शब्द ?

दोन महिन्यांपूर्वी शिक्कामोर्तब झालेल्या नागरदेवळे नगरपालिकेची पुन्हा ग्रामपंचायत झाली. हे कसं झालं याचं कोडं मला काही उलगडलं नाही. एका बाबतीत आपण सकारात्मकता दाखवायची आणि दुसरीकडे मात्र नकारात्मक निर्णय घ्यायचे असं तनपुरे म्हणाले.

यावर उद्योगमंत्री उदय सामंत(Uday Samant) म्हणाले, तनपुरे यांनी माझा आणि त्यांच्या राज्यमंत्रीपदाचा उल्लेख केला. पण ते जर आमच्यासोबत गुवाहाटीला आले असते तर त्यांच्याही मंत्रीपदासाठीची शिफारस आम्ही केली असती असं मिश्किल उत्तर दिलं. आणि सभागृहात एकच हशा पिकला.

Uday Samant & Prajakt Tanpure News
Maratha Reservation : मराठा समाजातील उमेदवारांना न्यायालयाचा मोठा दिलासा : 'या' नियुक्तींवरील स्थगिती उठवली!

जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला आणि...

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी उपमुख्यमंत्री जमीन गैरव्यवहाराच्या लक्षवेधीवर बोलण्यासाठी उभे राहताच त्यांना शाब्दिक चिमटा काढला. पाटील म्हणाले, तुम्ही आज आक्रमक दिसत नाहीत. चिडलेले दिसत नाहीत. एवढा घोटाळा समोर मांडला जाऊनही तुमच्या चेहऱ्यावर राग दिसत नाही.तुम्हाला राग आलेला नाही असं पाटील म्हणाले. त्यावर फडणवीसांनी मिश्किलपणे मला राग येतच नाही जयंतराव असं म्हणताच सभागृहात हशा पिकला.

अजित पवारांचीही फडणवीसांना कोपरखळी...

देवेंद्र फडणवीसांनी आम्ही मागे सभागृहात म्हणालो होतो की, या सगळ्याचा बदला घेऊ. पण आता आमचा बदला हाच आहे की, आम्ही या सगळ्यांना माफ केलं अशी टिप्पणी केली होती. त्यावरून विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवारांनी आज फडणवीसांनी कोपरखळी मारली. पवार म्हणाले, फडणवीसांना राग येत नाही, ते आता बदला म्हणून सगळ्यांना माफ करत सुटलेत असा उल्लेख करतानाच पुन्हा एकदा सभागृहात हास्यकल्लोळ उडाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com