Kirit Somaiya-Chandrakant Khaire
Kirit Somaiya-Chandrakant Khaire Sarkarnama
मराठवाडा

Chandrakant Khaire : स्टंटबाजीची सवय, म्हणूनच सोमय्यांवर हल्ला

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना स्टंटबाजीची सवयच जडली आहे, त्यामुळे नको तिथे नाक खुपसण्याची त्यांना खोड आहे. (Kirit Somaiya) दहा ठिकाणी फिरण्याची त्यांना गरज नव्हती, ते खार पोलिस स्टेशनला गेले म्हणूनच त्यांच्यावर हल्ला झाला, अशी टीका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केली. सोमय्या हे शक्ती कपूर असल्याचा उल्लेखही खैरे यांनी पुन्हा केला.

केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते औरंगाबादेत (Marathwada) सोलापूर-धुळे या महामार्गासह अन्य रस्त्यांचे लोकार्पण आणि चार नव्या मार्गांचे भूमीपूजन करण्यात आले. या कार्यक्रमानंतर प्रसार माध्यमांनी खैरे यांना सोमय्या यांच्यावर मुंबईत झालेल्या हल्यासंदर्भात प्रश्न विचारला.

त्यावर उत्तर देतांना खैरे म्हणाले, किरीट सोमय्या हे केवळ डायलॉगबाजी करत असतात. चित्रपटात डायलाॅगबाजी करणाऱ्या शक्ती कपूर सारखेच ते आहेत. ते राजकारणातील शक्ती कपूर आहेत. मुळात किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाला तर त्यांना दहा ठिकाणी फिरायची गरज काय ? असा सवाल देखील खैरे यांनी यावेळी केला.

खासदार नवनीत राणा, त्यांचे पती रवि राणा यांच्यावर पोलिसांनी कारवाई करत त्यांना अटक केली होती. अटक केल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी जात असताना शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्या गाडीवर काल रात्री हल्ला केला होता. गाडीवर बाटल्या, चपला फेकण्यात आल्या होत्या.

या हल्ल्यात सोमय्या किरकोळ जखमी देखील झाले होते. यानंतर भाजप नेत्यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. यावर खैरे यांनी सोमय्या यांना स्टंटबाजी करायची सवयच असल्याची टीका केली. डा. कराड यांनी आपल्या भाषणात खैरे यांच्यावर टीका केली, यावर बोलतांना खैरे म्हणाले, भागवत कराड हे अजून नवीन आहेत, त्यांना काही कळंत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT