Chandrakant Khaire counters Ambadas Danve  Sarkarnama
मराठवाडा

Chandrkant Khaire Vs Ambadas Danve: अंबादास दानवेला अक्कल आहे का? 2 दिवस थांबा, त्याचं सगळंच बाहेर काढतो : चंद्रकांत खैरेंचा कडक इशारा

Shivsena Internal Conflict : शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातील अंतर्गत वाद चिघळला असून अंबादास दानवेंवर आरोप करत चंद्रकांत खैरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सगळे उघड करण्याचा थेट इशारा दिला आहे.

Jagdish Pansare

Shivsena UBT News : लोकसभा, विधानसभा, नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची वाट लागली. लोकसभा निवडणुकीत सलग दोन पराभव पदरी आले, विधानसभेत पक्षाची पाटी जिल्ह्यात कोरी राहिली. नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत फुलंब्री वगळता इतर तालुक्यात पक्षाची कामगिरी आणखी खालावली. असे असले तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील दोन नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातील वाद काही थाबंत नाही.

महापालिका निवडणुकीतही या दोन नेत्यांनी एकमेकांवर तोंडसुख घेत पक्षातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आणलीच. मला विश्वासात न घेता उमेदवार याद्या आणि सगळे निर्णय घेतल्याचा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला. माजी महापौर अब्दुल रशीद खान यांच्या पक्षप्रवेशाला यातूनच खैरे यांनी कडाडून विरोध केला होता. तरीही मामूंसाठी दानवे यांनी तिकीट आणलेच.

बुधवारी (ता.14) पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांना तिळगुळ देण्याची इच्छा व्यक्त केली. ते जेष्ठ आणि एकनिष्ठ आहेत, असे कौतुकही शिरसाट यांनी केले होते. या संदर्भात माध्यमांनी जेव्हा अंबादास दानवे यांना विचारले, तेव्हा खैरे यांनी विधानसभेला संजय शिरसाट यांना मदत केली होती, त्यामुळेच शिरसाट खैरेंना तिळगुळ देत असतील, असा टोला लगावला होता. या आरोपावर आज महापालिका मतदानासाठी सहकुटुंब आलेल्या चंद्रकांत खैरे यांना माध्यमांनी बोलते केले.

अंबादास दानवे असं बोलला असेल तर त्याला अक्कल आहे का? माझ्यावर असे भलते सलते आरोप करायचे नाहीत. मी पक्षाचा एकनिष्ठ आहे म्हणूनच टिकून आहे. अंबादास दानवे पक्षात राहून कोणाला मदत करतो? ऐन निवडणुकीत चार दिवस तो कुठे गायब होता? आम्ही त्याला शोधत होतो, पण तो सापडला नाही.दोन दिवस जाऊ द्या, मी पत्रकार परिषद घेऊन त्याचं सगळंच बाहेर काढतो, असा इशारा चंद्रकांत खैरे यांनी यावेळी दिला.

महापालिका निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेतून चंद्रकांत खैरे यांना दूर ठेवण्यात आले. सगळी सूत्र अंबादास दानवे यांच्या हाती देण्यात आली होती. अगदी उमेदवारी देण्याचा निर्णय देखील अंबादास दानवे यांनीच घेतल्याचा दावा खैरे यांनी केला. ऐन निवडणुकीच्या आधी चार दिवस अंबादास दानवे कुठे गायब होता? असा सवाल करत चंद्रकांत खैरे यांनी त्यांच्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे आपण पत्रकार परिषद घेऊन करणार असल्याचे खैरे यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT