Chhatrapati Sambhajiagar : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सध्या खुलताबादचे रत्नपूर, दौलताबादचे देवगिरी असे नामकरण करण्यावरून जोरात राजकारण सुरू झाले आहे. औरंगजेबाची कबर उखडून फेकण्याच्या मागणीवरुन सुरु झालेल्या वादाने आता वेगळे वळण घेतले आहे. औरंगजेबची कबर असलेल्या खुलताबादचे नाव रत्नपूर करा, अशी मागणी भाजप-शिवसेना पक्षाकडून केली जात आहे.
यावर संतप्त झालेल्या माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी उद्विग्न होत नाव बदलण्याची मागणी करणाऱ्या नेत्यांना आता तुम्ही तुमच्या बापाची नावं बदला, असा टोला लगावला होता. इम्तियाज जलील यांच्या या विधानानंतर राजकारण अधिकच तापले आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी इम्तियाज यांना फटकारतानाच माझ्या बापाचे नाव भाऊराव खैरे हे आहे, आणि तेच राहणार. उगाच काहीही बोलू नका, असे म्हणत पलटवार केला.
जिथे जिथे बाद आहे, ते सगळं बाद करणार असं म्हणणाऱ्या पालकमंत्री संजय शिरसाट यांनाही खैरे (Chandrakant Khaire) यांनी टोला लगावला. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या सभेत 1988 मध्येच केले होते. तेव्हाच खुलताबादचे खरे नाव रत्नपूर असल्याचे त्यांच्या निदर्शनात आणून दिले होते. तेव्हा त्यांनी औरंगजेबाने बदलले नाव कशाला हवे? खुलताबाद नाही, रत्नपूरच असे जाहीर केले होते.
तेव्हापासून शिवसेना रत्नपूर असेच म्हणते, याची आठवण खैरे यांनी शिरसाट यांना करवून दिली. तसेच खुलताबादचे रत्नपूर अधिकृत करण्यासाठी विधिमंडळात ठराव घ्यावा लागतो, तो केंद्राकडे मंजूरीसाठी पाठवावा लागतो, नुसतं मिडियासमोर बोलून होत नाही, असा टोलाही खैरे यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांना लगावला. भाजपाचे नवनिर्वाचित आमदार संजय केनेकर यांनी खुलताबादचे रत्नपूर असे नामकरण करावे, अशी मागणी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडे केली.
त्यानंतर खऱ्या अर्थाने या वादाला सुरुवात झाली. इम्तियाज जलील यांनी शिरसाट व भाजपाच्या नेत्यांना मोदींच्या गुजरातमधील अहमदाबादचे नाव बदलून दाखवा, असे आव्हान दिले. रस्ते, गल्ल्या, शहरं, गावं, रेल्वेस्टेशन, विमानतळं, बसस्टॅंडची नाव बदलून झाली. आता यांना दुसरा काही उद्योग उरला नाही. विकासावर बोलण्यासारखं यांच्याकडे काही राहिलं नाही, म्हणून आता हे नाव बदलण्याची मागणी करत आहेत. माझा या सगळ्यांना सल्ला आहे, की त्यांनी आपल्या बापाची नावंही बदलून घ्यावी, असे वादग्रस्त विधान इम्तियाज जलील यांनी केले होते.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.