chhagan bhujbal manoj jarange patil sarkarnama
मराठवाडा

Video Chhagan Bhujbal : "जमाना जानता हैं हम किसीके बाप से भी नहीं डरते हैं", भुजबळांचा जरांगे-पाटलांना इशारा

Obc Agitation Jalna : जालन्यात लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे. पण, लढा सुरू राहणार असल्याचं हाकेंनी सांगितलं.

Akshay Sabale

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात येऊ नये, या मागणीसाठी गेल्या 10 दिवसांपासून ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचे वडीग्रोदी ( ता. अंबड, जि. जालना ) येथे प्रासंगिक उपोषण सुरू आहे.

या आंदोलनाला सरकारच्या शिष्टमंडळानं भेट दिली. यानंतर लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघरे यांनी आंदोलन स्थगित केलं. तेव्हा, मंत्री छगन भुजबळ, मंत्री धनंजय मुंडे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री उदय सामंत, आमदार गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे उपस्थित होते. यावेळी छगन भुजबळ यांनी जरांगे-पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

"आपल्याला खूप धमक्या देण्यात येतात. पण, सगळ्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे, जमाना जानता हैं, हम किसीके बाप से भी नहीं डरते हैं," असा इशारा भुजबळांनी ( Chhagan Bhujbal ) जरांगे-पाटील यांना दिला आहे.

छगन भुजबळ म्हणाले, "महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ओबीसी कार्यकर्ते उपोषणासाठी बसले आहे. पण, आम्ही त्यांची समजूत घातली आहे. कारण, आपल्याला लढायचं आहे. लढण्यासाठी आमचे वाघ परत रस्त्यावर पाहिजेत."

"आपल्याला खूप धमक्या देण्यात येतात. आपण कुणालाही धमक्या देत नाही. किंवा दादागिरी करत नाही. पण, सगळ्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे. शरीफ हैं हम किसीसे लढते नहीं हैं, जमाना जानता हैं हम किसीके बाप से भी नहीं डरते हैं," असं म्हणत भुजबळांनी जरांगे-पाटलांना ( Manoj Jarange Patil ) ललकारलं आहे.

"जातनिहाय जनगणेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा आहे. यापुढे तुम्ही सगळे एकत्र राहिलात, तर तुमचे आरक्षण टिकेल. त्यांची दादागिरी कधी थांबणार? आमच्यावरील अन्याय कधी थांबणार?" असे सवाल भुजबळांनी उपस्थित केले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT