Chhatrapati Sambhaji Nagar : गौण खनिजचे अवैधरित्या उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्या माफियांचे धाडस वाढले आहे. छत्रपती संभाजीनगर जवळ माफियांवर कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदारांसह महसूल पथकावर हल्ला करण्यात आला. संभाजीनगर शहरातील देवळाई-कचनेर रोडवरील भागात ही घटना घडली आहे. या प्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रामीण विभागाचे तहसीलदार रमेश मुंडलोड यांना अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन आणि वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार मुंडलोड यांनी या भागातील तलाठ्यांना कारवाईचे निर्देश दिले. मुंडलोड हे स्वतः खाजगी वाहनाने सहस्त्रमुळे येथील शिवारात गेले. तेथे मुरूमाने भरलेला एक गाडी त्यांनी पकडली.
मुरमाने भरलेल्या गाडीतून अवैधरित्य वाहतूक होत असल्याचे समोर आले. त्यानंतर तहसीलदारांच्या आदेशाने दोन तलाठीसुद्ध त्या गाडीत बसले त्यांनी गाडीवर कारवाईसाठी ती तहसील कार्यालयाकडे नेण्यास चालकाला सांगितले. तसेच तहसीलदार मुंडलोड हे जेसीबीवर कारवाईसाठी पुढे गेले. मात्र, मुरम घेऊन जाणाऱ्या गाडीतील चालकाने तलाठ्यांना धमकावले. तसेच रस्त्याने आणखी दोघे जण गाडीत येऊन बसले. त्यांनी दोन्ही तलाठ्यांना धमकावत धक्काबुक्की केली. तसेच तलाठ्यांना मारहाण करून गाडी खाली ढकलून देण्याची धमकी दिली.
तहसीलदार कारवाईसाठी पोहचले असता तेथील जेसीबी चालक पळून जाण्याच्या तयारीत होता. तहसीदारांनी तलाठ्यांना कारवाईचे निर्देश दिले मात्र तेथे जमलेल्या टोळक्याने तहसीलदार मुंडलोड, तलाठी राजेंद्र भांड, सतीश घुगे, मंडळ अधिकारी विश्वनाथ गांगुर्डे यांच्यावर हल्ला केला. यामध्ये काही तलाठी जखमी झाले. मारहाण करून हे टोळके पळून गेले. तर, पथकातील काही तलाठ्यांनी टोळक्यातील सलीम अबजल शेख याला पकडून ठेवले. या प्रकरणी चिखलठाणा पोलिस ठाण्यात १० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.