Mumbai News : मराठा आरक्षणासाठी लढा पुकारून सरकारला जेरीस आणणारे मनोज जरांगे पाटील राज्यभर दौरा करणार आहेत. रुग्णालयातून जरांगे पाटील यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यानंतर ते राज्यभरात दौरे करून विविध जिल्ह्यांत सभा घेणार आहेत. या वेळी जरांगे मराठा आऱक्षणाला विरोध करणाऱ्या ओबीसी नेत्यांचाही समाचार घेणार असल्याची शक्यता आहे. यामुळे मराठा आणि ओबीसी नेते असा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)
उपोषण आंदोलन स्थगित केल्यानंतर जरांगे पाटील यांनी आपण राज्यभर दौरा करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आता मनोज जरांगे पाटील यांच्या तिसऱ्या टप्प्यातील राज्यव्यापी दौऱ्याला आजपासून सुरुवात होत आहे. वाशी या ठिकाणी जरांगे यांच्या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या वेळी ते मराठा आरक्षणापासून ते आंदोलनाची पुढील दिशा काय असेल, यावर बोलणार आहेत.
दरम्यान, वाशी येथे मनोज जरांगे पाटील यांचे आगमन झाल्यानंतर त्यांच्यावर १५० जेसीबीतून फुलांची उधळण करण्यात येणार असून, यासाठी जवळपास ५ ते ६ टन फुलांच्या पाकळ्या करण्याचे काम सभास्थळी युद्धपातळीवर सुरू आहे, त्यामुळे त्यांच्या स्वागताच्या या जय्यत तयारीची आता एकच चर्चा सुरू झाली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.