Chhatrapati Sambhajinagar APMC News
Chhatrapati Sambhajinagar APMC News  Sarkarnama
मराठवाडा

Chhatrapati Sambhajinagar APMC News : सभापती पदाची माळ पठाडे- देशमुख ? की मग तिसऱ्याच्याच गळ्यात...

प्रकाश बनकर

Bjp-SS : छत्रपती संभाजीनगर बाजार समितीच्या निवडणुकीत (Chhatrapati Sambhajinagar APMC News ) भाजप-शिवसेना (शिंदे गटाने) १५ पैकी ११ जागेवर दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे युतीचा सभापती होणार हे निश्‍चित झाले आहे. सभापती पदासाठी अनेकजण इच्छुक असून यासाठी ते प्रयत्न करीत आहे. सभापतीपद मिळण्यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले असून सभापतीपदाची माळ कोणाच्या गळ्यात टाकायची हे आमदार हरिभाऊ बागडे (नाना) व पालकमंत्री संदीपान भुमरे हेच ठरवणार आहेत.

त्यामुळे पुन्हा इच्छुक असलेले माजी सभापती राधाकिसन पठाडे आणि नवनिर्वाचित संचालक अभिजित देशमुख यांनी या दोन्ही नेत्यांकडे लाॅबिंग सुरू केले आहे. (Mahavikas Aghadi) बाजार समिती निवडणूकीत काँग्रेसला चीतपट केल्यानंतर भाजप व शिंदे गटातर्फे ठिकठिकणी सत्कार समारंभ सुरू आहेत. दुसरीकडे सभापती पदासाठीही हालचाली सुरु झाल्या आहेत. यात माजी सभापती राधाकिसन पठाडे प्रमुख दावेदार आहेत.

मात्र, पहिल्यांदाच बाजार समितीच्या निवडणुकीत उतरलेले अभिजित देशमुख यांच्याकडूनही सभापती पदासाठी प्रयत्न केले जात आहेत. (Bjp) भाजपचे तालुकाध्यक्ष श्रीराम शेळके यांची देखील सभापती होण्याची इच्छा असल्याने त्यांनी देखील प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेसच्या ताब्यात असलेली ही बाजार समिती माजी सभापती पठाडे यांनी आमदार हरिभाऊ बागडे (Haribhau Bagde) यांच्या माध्यमातून भाजपच्या ताब्यात आणली.

काँग्रेसचे काही संचालक सोबत घेत पठाडे यांनी अडीच वर्षे बाजार समितीचा कारभार सांभाळला. आता झालेल्या निवडणुकीत देखील पठाडे यांची भूमिका महत्वाची होती. मात्र त्यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप झाल्यामुळे बागडे नाना पुन्हा त्यांना संधी देतात का? हे महत्वाचे आहे. पठाडे यांच्या नावावर फुली पडली तर पर्याय उपलब्ध राहावा म्हणून सभापती पदाच्या शर्यतीत श्रीराम शेळके आणि गणेश दहिहंडे हे देखील प्रयत्न करत आहेत.

सभापती पद जर भाजपकडे गेले तर उपसभापती पद हे शिंदे गटाकडे यायला पाहीजे, असा आग्रह शिवसेना (शिंदेगट) करतांना दिसत आहे. या संदर्भात काही संचालकांनी पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्याकडे पाठपुरावा सुरू केल्याची माहिती आहे. सभापती पदासाठी दावा करायचा आणि उपसभापती पद पदरात पाडून घ्यायचे असा प्रयत्न शिंदे गटाकडून सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT