Parbhani District APMC News : गड राखले, पण आता सभापती पदाचा आघाडीपुढे पेच..

Mahavikas Aghadi : सर्वच बाजार समितीच्या सभापती, उपसभापतीपदासाठी चुरस निर्माण झाली आहे.
Parbhani District APMC Election News
Parbhani District APMC Election NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Parbhani District APMC News) निवडणूक निकालानंतर आता सभापतिपदासाठी चुरस निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांनी स्वतःचे गड राखले असले तरी आता सभापती पदासाठी हे नेते कोणाच्या पारड्यात त्यांचे वजन टाकतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यात झालेल्या १० कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत यंदा महाविकास आघाडीची सरशी झाली.

Parbhani District APMC Election News
Sanjay Shirsat On Sanjay Raut : पवार कुटुंबामध्ये कहल निर्माण करणाऱ्या राऊतला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जोड्याने मारतील..

महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांनी व लोकप्रतिनिधींनी आपापले गड राखले. असे असले तरी जिल्ह्यातील बहुतांश सहकारी संस्था, ग्रामपंचायत ताब्यात असतानाही महाविकास आघाडीला काही बाजार समित्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला. खासदार संजय जाधव, (Sanjay Jadhav) आमदार सुरेश वरपुडकर, आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यासह माजी आमदार विजय भांबळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांनी त्यांच्या प्रभावक्षेत्रातील बाजार समितीत्यांवर बहुमत मिळविले.

तर दुसरीकडे भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर (Meghna Bordikar) व रासपचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांना मात्र त्यांच्याच मतदार संघात दोन बाजार समित्यांवर पाणी सोडावे लागले. जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायत, सहकारी संस्था या राष्ट्रवादी कॉँग्रेस, कॉँग्रेस व शिवसेनेच्या (ठाकरे गट) ताब्यात आहेत. त्यामुळेच त्यांना हे यश सहजरीत्या पटकविता आले. त्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांचा ही मोठा वाटा आहे.

जिंतूरच्या भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांचा मतदार संघ जिंतूर व सेलू या दोन तालुक्याचा आहे. जिंतूर हे त्यांचे होमपिच असल्यामुळे त्या ठिकाणच्या बाजार समितीमध्ये बहुमत त्यांच्या बाजून आले. मात्र, त्यांच्याच मतदार संघातील सेलू बाजार समितीवर जिंतूरचे माजी आमदार विजय भांबळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसने बहुमत मिळविले. दुसरीकडे गंगाखेडेच रासप आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी खुद्द गंगाखेड बाजार समितीमध्येच आठ जागांवर समाधान मानावे लागले.

या ठिकाणी महाविकास आघाडीच्या पॅनलने बहुमत स्वतःकडे ठेवले आहे. पालममध्ये मात्र रासप, शिवसेना शिंदे गटाकेड १४ मिळवून यश संपादन केले आहे. निवडणुका जिंकल्यानंतर नेत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला तोच आता त्यांच्यापुढे सभापती कुणाला करायचे याचा पेच निर्माण झाला आहे. सर्वच बाजार समितीच्या सभापती, उपसभापतीपदासाठी चुरस निर्माण झाली आहे. स्वतःच्या क्षेत्रातील प्रभाव कायम ठेवण्यासाठी नेत्यांनी निवडणूक प्रतिष्ठेची करून यश संपादन केले. आता सभापतिपदासाठी हीच नेते मंडळी एकमेकांवर कुरघोडी करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com