Former Kannada MLA Nitin Patil's car accident Sarkarnama
मराठवाडा

Ex MLA Car Accident : माजी आमदाराच्या कारचा सोलापूर-धुळे महामार्गावर भीषण अपघात, म्हशीचा जागीच मृत्यू अन्...

Jagdish Patil

Chhatrapati Sambhajinagar News, 27 Sep : माजी आमदाराच्या भरधाव कारने एका म्हशीला धडक दिल्याने भीषण अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात माजी आमदार थोडक्यात बचावले आहेत.

मात्र, अपघाताची एवढा भयानक होता की, म्हशीचा जागीच मृत्यू झाला असून कारच्या पुढील भागाचा पूर्ण चुराडा झाला आहे. कन्नडचे माजी आमदार नितीन पाटील यांच्या कारचा हा अपघात झाला आहे.

या भीषण अपघातात कारच्या एअरबॅग उघडल्याने पाटील थोडक्यात बचावले आहेत. सोलापूर (Solapur) धुळे महामार्गावर वेरूळ उड्डाणपूल नजीक हा अपघात घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कन्नडचे माजी आमदार नितीन पाटील (Former Kannada MLA Nitin Patil) यांच्या भरधाव कारसमोर अचानक एक म्हैस आल्याने हा भीषण अपघात झाला.

यावेळी कारच्या समोरील भागाचा पूर्ण चुराडा झाला आहे. तर म्हशीचा जागीच मृत्यू झाला आहे. सुदैवाने कारच्या एअरबॅग वेळीच उघडल्याने नितीन पाटील (Nitin Patil) थोडक्यात बचावले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT