Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation News. Sarkarnama
मराठवाडा

Municipal Corporation News : महापालिकेच्या प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब; आता लक्ष महापौर आरक्षण सोडतीकडे

Municipal Corporation Election 2026 : दरम्यान, या प्रारूप प्रभाग रचनेवर 552 आक्षेप दाखल झाले. त्यात सर्वाधिक सूचना-हरकती प्रभाग रचनेचे नकाशे आणि व्याप्तीतील विसंगतीवर होत्या.

Jagdish Pansare

  1. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेला राज्य सरकारकडून अंतिम मंजुरी देण्यात आली आहे.

  2. प्रभाग निश्चितीनंतर आता महापौर पदाच्या आरक्षण सोडतीची सर्वांना प्रतीक्षा आहे.

  3. या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना आणि तयारीला वेग आला आहे.

Chhatrapati Sambhjinagar : छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचनेच्या आराखड्यावर निवडणूक आयोगाने अखेर शिक्कमोर्तब केले. अंतिम आराखड्याच्या हद्दी, नकाशे शुक्रवारी रात्री उशिरा महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहेत. त्यानंतर प्रारूप प्रभाग रचनेत काय बदल करण्यात आले हे स्पष्ट होणार आहे.

महापालिकेची (Municipal Corporation) रखडलेली निवडणूक घेण्याच्या अनुषंगाने तयारी सुरू करण्यात आली. महापालिकेची यंदा प्रथमच प्रभाग रचनेनुसार निवडणूक होत आहे. शासन, निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिकेने चार नगरसेवकांचे 29 तर तीन नगरसेवकांचा एक असे 29 प्रभाग तयार करून हा आराखडा तयार केला. दरम्यान, या प्रारूप प्रभाग रचनेवर 552 आक्षेप दाखल झाले. त्यात सर्वाधिक सूचना-हरकती प्रभाग रचनेचे नकाशे आणि व्याप्तीतील विसंगतीवर होत्या.

त्यानुसार महिला व बालकल्याण विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांनी सुनावणी घेतली. त्यानंतर आवश्‍यक ते बदल करून हा आराखडा पुन्हा राज्य शासनाला सादर करण्यात आला. शासनाने तो अंतिम करत आयोगाला सादर केला. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी निवडणूक आयोगासमोर सादरीकरण केले. त्यानुसार आयोगाने प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचा अंतिम आराखडा शुक्रवारी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यास मान्यता दिली.

हालचालींना येणार वेग

प्रभाग रचना अंतिम झाल्यामुळे राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग येणार आहे. कोणत्या प्रभागात कोणता उमेदवार प्रभावी ठरेल, याचे अंदाज आत्तापासूनच बांधले जात असले तरी प्रभाग रचना अंतिम करताना झालेले बदल देखील महत्वाचे ठरणार आहेत. त्यावरून राजकीय पक्षांचे ताळेबंद बांधले जाणार आहे. प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्यावर सत्ताधारी महायुतीतील भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस व विरोधी पक्षातर्फे देखील आक्षेप घेण्यात आले होते. त्यामुळे निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचा आराखडा अंतिम करताना केलेले बदल कोणत्या पक्षाच्या पथ्यावर पडतील हे लवकरच कळणार आहे.

नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर झाला तेव्हा, सत्ताधारी भाजपला सर्वाधिक फायदा होणार असा आरोप केला जात होता. असे असले तरी अनेक प्रभागातील भाजप पदाधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदवले. भाजपाचा मित्र पक्ष शिवसेना देखील प्रारूप प्रभाग रचनेवर नाराज होती. त्यामुळे प्रभाग रचना अंतिम करताना ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला असल्याचेही बोलले जात आहे.

आता महापौरांच्या आरक्षण सोडतीकडे लक्ष

प्रभाग रचना अंतिम झाल्यामुळे आता महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यात मतदार यादी अंतिम करणे, प्रभागामधील आरक्षण सोडत यासह इतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच महापौरांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम देखील जाहीर होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर शहराचे महापौर कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होते, यावर देखील राजकीय गणिते ठरणार आहेत.

नगरसेवकांची संख्या ः 115

चार नगरसेवकांचे प्रभाग ः 28

तीन नगरसेवकांचा प्रभाग ः 1

FAQs

1. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची प्रभाग रचना मंजूर झाली का?
👉 होय, राज्य सरकारने प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब केले आहे.

2. पुढील प्रक्रिया काय असणार आहे?
👉 पुढील टप्प्यात महापौर पदाच्या आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडणार आहे.

3. या निर्णयाचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
👉 विविध पक्ष आता महापौरपदाच्या आरक्षणानुसार रणनीती आखतील.

4. आरक्षण सोडती कधी होण्याची शक्यता आहे?
👉 लवकरच महापालिका प्रशासन आणि राज्य सरकार त्याची तारीख जाहीर करणार आहेत.

5. प्रभाग रचनेबाबत कोणते मोठे बदल झाले आहेत का?
👉 काही प्रभागांचे सीमांकन नव्याने करण्यात आले असून, मतदारसंख्या संतुलित ठेवण्याचा प्रयत्न आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT