Leaders of BJP, MIM, Shiv Sena and Vanchit Bahujan Aghadi during discussions ahead of Standing Committee member selection in Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation. Sarkarnama
मराठवाडा

Municipal Corporation News : छत्रपती संभाजीनगर महापालिकेत स्थायी समितीवर कोणाची वर्णी? वंचितला मोठी संधी...

Sambhajinagar Standing Committee : छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या स्थायी समितीसाठी भाजप, एमआयएम, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीत रस्सीखेच सुरू असून सदस्य निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

माधव इतबारे

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या स्थायी समितीसह पाच विषय समीत्यांचे सदस्य नियुक्त करण्यासाठी उद्या (ता. 5), गुरुवारी सकाळी अकरा वाजता विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. पाच जणांचा गट असलेल्या वंचित बहुजन आघाडीने एक नाव निश्‍चित केले आहे. भाजपच्या सर्वाधिक आठ सदस्यांची वर्णी लागणार आहे, पण पहिल्या वर्षी आपल्याला स्थायी समिती नको, असा अनेकांचा सूर आहे.

शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह ‘एमआयएम’ मध्ये स्थायी समितीवर जाण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. महापालिकेच्या 115 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक 57 नगरसेनक निवडून आले आहेत. त्यापाठोपाठ एमआयएम पक्षाचे 33, शिवसेना-13, शिवसेना ठाकरे पक्षाचे-6, वंचित बहुजन आघाडी-4, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा प्रत्येकी एक नगरसेवक निवडून आला आहे.

पक्षीय बलाबलानुसार स्थायी समितीवर सदस्य निवडले जातात. 16 जणांच्या स्थायी समितीवर भाजपचे 8, एमआयएमचे 4, शिवसेनेचे -2, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे-1 व लोकसेवा विकास आघाडीचा (वंचित आणि काँग्रेस) 1 सदस्य नियुक्त केला जाईल. गुरुवारी (ता. 5) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत प्रत्येक पक्षाचा गटनेता त्यांच्या सदस्यांची नावे महापौरांकडे सुपूर्त करेल.

त्यासोबतच महिला व बालकल्याण, शहर सुधार, शिक्षण, आरोग्य, समाजकल्याण या पाच समित्यांसाठी प्रत्येकी 9 सदस्य निवडले जाणार आहेत. या समितीमध्ये भाजप-4, एमआयएम-3, शिवसेना-1, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष-1 या प्रमाणे 9 सदस्य निवडले जाणार आहेत.

भुईगळ यांचे नाव निश्‍चित

सर्वसाधारण सभेत गट नेत्यांनी बंद लिफाफ्यात दिलेली नावे महापौर वाचून दाखवितील. त्यापूर्वीच लोकसेवा विकास आघाडीने आपल्या नावाची घोषणा केली आहे. या आघाडीत पाच सदस्य आहेत. प्रत्येक सदस्याला एक वर्ष स्थायी समितीवर पाठविण्यात येईल. पहिल्या वर्षासाठी अमित भुईगळ यांचे नाव अंतिम करण्यात आले आहे. त्यानंतर अनुक्रमे मलेका कुरैशी, जरीना जावेद कुरेशी, करुणा जाधव आणि शेवटच्या वर्षी मी स्थायी समितीवर जाईल, असे गट नेते अफसर खान यांनी सांगीतले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT