Congress News : काँग्रेसचा गटनेताच फुटला!जालना महापालिकेत नाचक्की; एक स्वीकृत सदस्य करण्याची संधीही हुकली!

BJP vs Congress Jalna Politics : जालना महानगरपालिकेत काँग्रेस गटनेत्याने भाजप उमेदवाराला पाठिंबा दिल्याने काँग्रेसची स्वीकृत सदस्याची संधी हुकली असून पक्षात अंतर्गत संघर्ष आणि राजकीय वाद तीव्र झाला आहे.
Political tension rises in Jalna Municipal Corporation after Congress group leader backs BJP nominee, leading to loss of nominated member opportunity.
Political tension rises in Jalna Municipal Corporation after Congress group leader backs BJP nominee, leading to loss of nominated member opportunity.Sarkarnama
Published on
Updated on

Jalna Municipal Corportaion News : काँग्रेस पक्षाने ज्या नगरसेवकावर विश्वास ठेवून त्याला महापालिकेत गटनेता केले, त्यानेच गद्दारी करत सत्ताधारी भाजपाशी हा‍तमिळवणी केली. त्यामुळे 9 नगरसेवकांच्या संख्याबळाच्या आधारे एक स्वीकृत सदस्य पाठवण्याची काँग्रेसची संधीही हुकली. उलट भाजपाने निवडणुकीत पराभूत झालेल्या आपल्या एका कार्यकर्त्याला काँग्रेसच्या पाठिंब्यावर स्वीकृत सदस्य करत बाजी मारली. गटनेताच गद्दार निघाल्यामुळे काँग्रेसचे स्थानिक नेते चांगलेच संतापले आहेत.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी गटनेत्यावर कारवाई करत, काँग्रेसच्या वाट्याची स्वीकृत सदस्य पदाची जागा रिक्त ठेवावी, अशी मागणी महापालिकेच्या आयुक्त तथा जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. आमचा गटनेता गद्दार निघाला, त्याने भाजपाकडून पैसे घेऊन विश्वासघात केल्याचा आरोप करत देशमुख यांनी संताप व्यक्त केला. जिल्ह्याचा खासदार काँग्रेस पक्षाचा असताना नगरसेवकांवर कुठल्याच स्थानिक नेत्याचा वचक राहिला नसल्याचे या प्रकारावरून दिसून आले आहे.

तर दुसरीकडे सत्तेसाठी भाजपाने फोडाफोडीचे राजकारण अजूनही सुरूच ठेवल्याची चर्चा या निमित्ताने जिल्ह्याच्या राजकारणात होऊ लागली आहे. महापालिकेच्या 6 स्वीकृत नगरसेवकांसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करताना काँग्रेसचा गटनेते फारूक तुंडीवाले पक्षाने ठरवून दिलेल्या स्वीकृत नगरसेवकाच्या पाठीशी न राहता भाजपच्या एका पदाधिकाऱ्याला पाठिंबा दिला. या जोरावर भाजपाने एक अतिरिक्त जाता आपल्या पदारात पाडून घेतली.

या घडामोडीनंतर काँग्रेसमध्ये संतापाची लाट पसरली आहे. फारूक तुंडीवाले यांच्याविरोधात स्थानिक नेते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. आमचा गट नेता विकला गेला, अशी जाहीर खंत जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी व्यक्त केली. या नगरसेवकाला निवडून येताना पंजा निशाणी लागते, निवडून आल्यावर मात्र ते स्वतःला विकतात. ज्या जातीयवादी भाजपाच्या विरोधात मतदारांनी कौल दिला, आज त्याच पक्षाला आमच्या गट नेत्याने मदत केली.

काँग्रेसने गटनेता नियुक्त करताना जी घटना तयार केली, त्यानुसार जिल्हाध्यक्षांनी दिलेल्या आदेशाचे पालन महापालिकेत करणे त्यांना बंधनकारक आहे. परंतु फारूक तुंडीवाले यांनी काँग्रेसचे अब्दुल अजीज यांच्या नामनिर्देशन पत्रावर स्वाक्षरी न करता भाजप उमेदवाराच्या नामनिर्देशन पत्रावर पाठिंब्याची स्वाक्षरी करत गद्दारी केली, असा आरोप राजाभाऊ देशमुख यांनी केला.

जालना महानगरपालिकेसाठी 6 स्वीकृत नगरसेवकांसाठी नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत. यामध्ये भाजपसाठी 4 शिवसेना आणि काँग्रेससाठी प्रत्येकी 1 स्वीकृत नगरसेवक मिळणार होते. भाजपकडून महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यपदासाठी अर्जुन गेही, शोभा नारियलवाले, आनंद झारखंडे, सिद्धिविनायक मुळे या 4 सदस्यांचे तर शिवसेनेकडून अश्विन आंबेकरना आणि काँग्रेस गटनेत्याच्या पाठींंब्याने भाजपचे विनोद रत्नपारखे यांनी (ता. 2) फेब्रुवारी रोजी नामनिर्देशन पत्र दाखल केले.

Political tension rises in Jalna Municipal Corporation after Congress group leader backs BJP nominee, leading to loss of nominated member opportunity.
BJP News : भाजपाच्या धक्कातंत्राने, कराड, रहाटकर, दानवे, मुंडेंचा पत्ता कट; मराठवाड्यातून राज्यसभेवर तिसरा खासदार

बैठकीमध्ये काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला स्वीकृत सदस्य पदाचे नामनिर्देशन पत्र देण्याचे निश्चित झाले होते. काँग्रेसचे गटनेते फारूक तुंडीवाले यांनी भाजपचे विनोद रत्नपारखे यांना काँग्रेसकडून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुभा दिली. त्यामुळे काँग्रेसऐवजी भाजपचा एक स्वीकृत नगरसेवक काँग्रेसकडून मैदानात उतरला आहे.

Political tension rises in Jalna Municipal Corporation after Congress group leader backs BJP nominee, leading to loss of nominated member opportunity.
Rajya Sabha Election 2026 : राज्यसभेसाठी पवारांच्या नावाला ठाकरेंचा विरोध? जयंत पाटील अन् सुप्रिया सुळे मातोश्रीवरून माघारी फिरताच आदित्य ठाकरेंनी केलेलं ट्विट चर्चेत

जिल्हाध्यक्षच काँग्रेस संपवत आहेत..

दरम्यान या प्रकारानंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी आमचा गटनेता विकला गेला त्यामुळे ही परिस्थिती ओढावल्याचा आरोप केला. त्याला गटनेते फारूक तोंडीवाले यांनी प्रत्युत्तर दिले. जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी 3 नाव दिले होते. त्यातून त्यांनी राजकारण करून आमच्यावर दबाव आणला. काँग्रेस संपवण्याचं काम जिल्हाध्यक्ष करत असून त्यांची पक्षातून आणि पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी आपण पक्षश्रेष्ठींकडे करणार आहोत, असा दावा केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com