Police and election officials during municipal election duty in Chhatrapati Sambhajinagar after FIRs were registered against absentee government staff for dereliction of duty. Sarkarnama
मराठवाडा

Election Duty News: निवडणुकीच्या जबाबदारीतून अंग झटकलं! 155 कर्मचाऱ्यांवर प्रशासनाकडून गुन्हे दाखल

Election Duty Negligence : छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत कर्तव्य टाळणाऱ्या 155 सरकारी कर्मचाऱ्यांवर पोलिसांत गुन्हे दाखल करत प्रशासनाने कडक कारवाई केली असून प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhaji Nagar News : तब्बल दहा वर्षानंतर होणाऱ्या महापालिका निवडणुका सुरळीत पार पडाव्यात यासाठी निवडणूक विभाग आणि प्रशासन गेल्या महिनाभरापासून राबत आहे. प्रत्येकाला ज्याची त्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. परंतु निवडणुक प्रशिक्षणापासून ते मतदान प्रक्रिया पार पडेपर्यंत सोपवलेल्या जबाबदारीकडे पाठ फिरवणाऱ्या 155 शासकीय कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने कारवाईचा दंडुका उगारला आहे.

या सर्व दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर पोलीसांत गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. निवडणूक कामात हलगर्जीपणा आणि आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत, प्रशासनाने या सर्व कर्मचाऱ्यांविरुद्ध सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. या धडक कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी विविध विभागांतील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी आणि इतर सहाय्यक कर्मचाऱ्यांचा समावेश होता. मात्र, मतदानाच्या दिवशी आणि त्यापूर्वीच्या साहित्य वाटपाच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर हे 155 कर्मचारी गैरहजर राहिले होते.

निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून या कर्मचाऱ्यांना वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या, तरीही त्यांनी या आदेशाला गांभीर्याने घेतले नाही. अखेर या सर्व कर्मचाऱ्यांवर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. मतदारांमध्ये उत्साह होता, काही ठिकाणी बोगस मतदान, पैसे वाटप आणि हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. उद्या मतमोजणी होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT