Chhatrapati Sambhajinagar Municipal Election Sarkarnama
मराठवाडा

Atul Save On Congress: दहा वर्षापुर्वीचा फॉर्म्युला आता चालणार नाही; भाजपनं शिवसेनेला ठणकावलं!

Chhatrapati Sambhajinagar Municipal Election: भाजपची ताकद शहरात वाढलेली आहे. यामुळे 2015 च्या फॉर्म्युल्यावर युती होणे शक्य नाही. नवीन परिस्थितीनुसार पन्नास टक्के जागा मिळाल्या तरच महापालिका महायुतीत लढू, असे अतुल सावे यांनी स्पष्ट केले.

सरकरानामा ब्युरो

सचिन पवार

Shivsena-BJP News: "छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीची चर्चा सुरू झाली आहे. पहिल्या फेरीतच गरमा गरमी सुरू असून शिवसेनेने दहा वर्षापुर्वीच्या फॉर्म्युला आणि त्यानूसार जागा वाटपाची मागणी केली आहे. यावर भाजपचे मंत्री अतुल सावे यांनी आता परिस्थिती बदलली आहे, दहा वर्षापुर्वीचा फॉर्म्युला चालणार नाही. फिप्टी फिप्टीवरच चर्चा होऊ शकते," अशा शब्दात शिवसेनेला ठणकावले आहे. अन्यथा आम्ही निर्णय पक्षश्रेष्ठींवर सोडू, असा इशाराही सावे यांनी दिला.

दुसरीकडे शिवसेनेचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी मात्र महापालिकेत महायुती झाली पाहिजे, अशी भूमिका मांडली आहे. एकमेकांवर टीका टाळावी, कोणाची ताकद वाढली, कमी झाली? याची चर्चा माध्यमांसमोर नको, एकत्र बसून मार्ग काढू, अशी सामंजस्याची भूमिका घेतली आहे. युतीच्या सुरवातीच्या बैठकीतच जागा वाटपावरून तानातानी सुरू झाल्याने युतीचे काय होणार? असा प्रश्न महायुतीतील तीनही पक्षांना पडला आहे.

पूर्वी महापालिका निवडणुकीत शिवसेना मोठा भाऊ होता. 2015 मध्ये त्यांनी जास्त जागा लढवल्या. परंतु दहा वर्षात परिस्थिती बदलली आहे. भाजपची ताकद शहरात वाढलेली आहे. यामुळे 2015 च्या फॉर्म्युल्यावर युती होणे शक्य नाही. नवीन परिस्थितीनुसार पन्नास टक्के जागा मिळाल्या तरच महापालिका महायुतीत लढू, असे अतुल सावे यांनी स्पष्ट केले.

महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत. त्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेना- भाजपने युतीत ही निवडणूक लढवावी असे संकेत वरिष्ठांनी दिले आहेत. परंतु शिंदे गटाकडून 2015 च्या जागा वाटपाच्या फॉर्मुल्यानुसार युती व्हावी, असा आग्रह धरला जात आहे. यावर मंत्री सावे यांनी दहा वर्षांपूर्वी महापालिका निवडणूक झाली होती. त्यावेळी युतीत शिवसेना मोठा भाऊ होता. परंतु आता दहा वर्षात परिस्थिती फार बदललेली आहे.

अनेक वरिष्ठ नेत्यांच्या सहकार्याने भाजपने शहरात अनेक विकास कामे केली आहेत. पक्षाकडे येणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे निश्चितच भारतीय जनता पक्षाची ताकद शहरात पूर्वीपेक्षा वाढलेली आहे. यामुळे जुन्या फॉर्म्युल्यानुसार युती शक्य नसल्याचे स्पष्ट केले. आता युतीसाठी नवीन फॉर्म्युला स्वीकारावा लागेल. यात 50 टक्के जागा भारतीय जनता पक्षाचा वाट्याला यायला हव्यात तरच युती करू, अन्यथा आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्याबाबत वरिष्ठांना कळविले जाईल. प्रदेश स्तरावरील वरिष्ठ याबाबत जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल आणि त्यानुसार पुढील प्रक्रिया होईल, असेही सावे यांनी सांगितले.

राष्ट्रवादी, आरपीआयला दोघांच्या कोट्यातून जागा

युतीतील केवळ शिवसेनाच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि आरपीआय सारख्या पक्षांशीही चर्चा होईल. त्यांनाही सोबत घेतले जाईल, या दोन्ही मित्र पक्षांना भाजप आणि शिवसेना अशा दोघांच्या वाटेला आलेल्या जागेतून जागा दिल्या जातील, असेही सावे यांनी स्पष्ट केले.

सर्व आमदार युतीत निवडून आले

शहरात आमचे आमदार जास्त म्हणून आम्हाला जास्त जागा हव्यात, असे शिवसेनेकडून म्हटले जाते. याबाबत त्यांना विचारल्यावर विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युतीत लढली. त्यामुळे सर्व आमदार हे युतीत निवडून आलेले आहेत, असा टोलाही सावे यांनी शिवसेनेला लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT