Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीत आघाडीचा 'टांगा पलटला' आता महापालिकेत 'घोडेही' फरार होणार; एकनाथ शिंदेंचा टोला

Kalyan Dombivli election 2025 Eknath Shinde Attack ON Mahavikas Aghadi: राज्यातील जनतेच्या विकासासाठी काम करत असताना कोण काय बोलत आहे याकडे आपण लक्ष देत नाही. आरोपांना आरोपातून नाही तर कामातून उत्तर दिले जाते आणि टीकेला टीकेतून नव्हे तर विकासकामांतूनच प्रत्युत्तर दिले जाते, असे त्यांनी स्पष्ट केले.

Kalyan Dombivli election 2025 Eknath Shinde Attack ON Mahavikas Aghadi:
Kalyan Dombivli election 2025 Eknath Shinde Attack ON Mahavikas Aghadi: Sarkarnama
Published on
Updated on

डोंबिवली: महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर आता सत्ताधारी-विरोधक यांच्यात आरोप-प्रत्योरोपांच्या फैरी झडत आहे. कल्याण पूर्वमध्ये झालेल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला.

"लोकसभा आणि विधानसभा निवडणुकामध्ये महाविकास आघाडीचा टांगा पलटला असून येणाऱ्या महापालिका निवडणुकीत त्यांचे घोडेही फरार होतील," असा खोचक टोला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला. केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण पूर्वेतील दादासाहेब गायकवाड क्रीडांगणावर झालेल्या जाहीर पक्षप्रवेश सोहळ्यात त्यांनी विरोधकांवर निशाणा साधत निवडणूक प्रचाराची औपचारिक सुरुवात केली.

या सोहळ्यात काँग्रेसचे माजी नगरसेवक सचिन पोटे, काँग्रेसच्या माजी नगरसेविका जान्हवी पोटे, मनसेचे माजी नगरसेवक कस्तुरी देसाई, कौस्तुभ देसाई यांच्यासह काँग्रेस पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी सचिन पोटे यांचे विशेष कौतुक करत ते लढवय्ये आणि प्रामाणिक कार्यकर्ते असल्याचे नमूद केले. ज्या ज्या ठिकाणी त्यांनी काम केले, तेथे त्यांनी जबाबदारीने आणि निष्ठेने काम केल्याचेही त्यांनी सांगितले.

विरोधकांच्या टीका आणि टोमण्यांवर भाष्य करताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील जनतेच्या विकासासाठी काम करत असताना कोण काय बोलत आहे याकडे आपण लक्ष देत नाही. आरोपांना आरोपातून नाही तर कामातून उत्तर दिले जाते आणि टीकेला टीकेतून नव्हे तर विकासकामांतूनच प्रत्युत्तर दिले जाते, असे त्यांनी स्पष्ट केले.


Kalyan Dombivli election 2025 Eknath Shinde Attack ON Mahavikas Aghadi:
ZP Election: जिल्हा परिषद निवडणुकीबाबत मोठी अपडेट, निवडणूक आयोगाने केला मोठा बदल, इच्छुकांची धडधड वाढली

येणाऱ्या महापालिका निवडणुकीत महायुतीचीच सत्ता येणार हा ठाम विश्वास व्यक्त करताना एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची टीम दिवसेंदिवस अधिक मजबूत होत आहे. या टीममध्ये आधीच अनुभवी आणि ताकदवान खेळाडू आहेत आणि आता सचिन पोटे यांच्या प्रवेशामुळे संघाला आणखी बळ मिळाले आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत महायुतीच्या विजयाबाबत कोणताही संशय नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सर्वसामान्य नागरिकांना न्याय द्यायचा असेल आणि शहराचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर शिवसेनेशिवाय पर्याय नाही, असा ठाम दावा करत त्यांनी सांगितले की शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून येथे कोणी मालक नाही आणि कोणी नोकर नाही. सचिन पोटे यांचा पक्षात योग्य सन्मान केला जाईल आणि त्यांचा अनुभव व कार्यक्षमता पक्षवाढीसाठी आणि महापालिका निवडणुकीसाठी प्रभावीपणे वापरली जाईल, असे आश्वासनही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com