Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Sarkarnama
मराठवाडा

Municipal Recruitment Scam: : महापालिका परीक्षेत गडबड! दोन 'टॉपर' निघाले कॉपी बहाद्दर; तब्बल ४० जणांवर कारवाई

Chhatrapati Sambhajinagar Municipal : या परीक्षेत ३५ ते ४० जणांनी गडबडी केल्याचे आयबीपीएस कंपनीच्या निदर्शनास आले आहे. त्यानुसार त्यांनी आपला अहवाल दिला आहे.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar : महापालिकेच्या २२२ पदांसाठी शासनमान्य आयबीपीएस एजन्सीमार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेत काही जणांनी घोळ केल्याचे समोर आले आहे. कॉपी करूण दोघे जण टॉपर बनले होते तर उर्वरित ३५ ते ४० जणांनी विविध प्रकारच्या गडबडी केल्या. त्यामुळे या सर्वांना बाद करण्यात आले आहे.

११ संवर्गसाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेतील आठ संवर्गाचा निकाल आत्तापर्यंत प्रसिद्ध करण्यात आला आहे. उर्वरित तीन संवर्गाचे निकाल लवकरच प्रसिद्ध होणार आहेत.

महापालिकेत रिक्त पदांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने टप्प्या-टप्प्याने नोकर भरती केली जात आहे. शासनमान्य आयबीपीएस कंपनीमार्फत अग्निशामक १००, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ३२, स्थापत्य अभियांत्रिकी / अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक २४, चालक-यंत्रचालक १५, स्वच्छता निरीक्षक १२, रोखपाल १२, अनुलेखक (ट्रेसर) ९, पशुधन पर्यवेक्षक ७, उद्यान सहाय्यक-कृषी सहाय्यक ६, उपअग्निशमन केंद्र अधिकारी ४, साहाय्यक सुरक्षा अधिकारी १, अशा पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती.

या भरतीसाठी तब्बल ४० हजार बेरोजगार तरुणांनी अर्ज केले होते. कंपनीने ८ व ९ जुलैला ऑनलाइन परीक्षा घेतली. सहायक सुरक्षा अधिकारी, उपअग्निशमन केंद्र अधिकारी, उद्यान सहायक/कृषी सहायक, पशुधन पर्यवेक्षक, अनुरेखक, अशा पाच संवर्गाचे निकाल जाहीर करण्यात आले. यासंदर्भात आयुक्त अमोल येडगे यांनी शुक्रवारी (ता. १९) पत्रकारांशी संवाद साधला.

आणखी तीन संवर्गाचे निकाल आयबीपीएस कंपनीने जाहीर केले आहेत. त्यात त्यात अग्नीशामक, अग्नीशामक चालक, रोखपाल यांचा समावेश आहे. अद्याप कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), स्थापत्य अभियांत्रिकी/अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक, चालक-यंत्रचालक अशा अशा तीन संवर्गाचे निकाल लवकरच जाहीर केले जाणार आहेत. या परिक्षेत ३५ ते ४० जणांनी गडबडी केल्याचे आयबीपीएस कंपनीच्या निदर्शनास आले आहे. त्यानुसार त्यांनी महापालिकेला अहवाल पाठविला असून, या सर्वांना बाद करण्यात आले असल्याचे अमोल येडगे यांनी सांगितले.

कॉपीत टॉपर, तोडींत मार्कही आठवेना..

सहाय्यक पशूधन पर्यवेक्षक व अग्निशामक या पदासाठी दोन जण टॉपर होते. त्यांनी परीक्षेच्या शेवटच्याक्षणी पाच ते दहा मिनिटात उत्तरपत्रिकेवर टीकमार्क केल्याचे सीसीटीव्हीत लक्षात आले. त्यानुसार या दोघांना पाचारण करून त्यांची तोंडी परिक्षा घेण्यात आली. मात्र त्यांना १० वी परीक्षेतील गुणही नीटपणे सांगता आले नाहीत. त्यानंतर दोघांची स्वतंत्र लेखी परीक्षा घेण्यात आली, त्यात नापास झाल्यानंतर या दोघांनाही बाद करण्यात आल्याचे येडगे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT