Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation  Sarkarnama
मराठवाडा

Aimim news : नावावरून राजकारण नको, आता विकासाकडे लक्ष देऊ! एमआयएमच्या विरोधी पक्ष नेत्याचा भाजपच्या सभापतींना सल्ला..

Chhatrapati Sambhajinagar dispute News : एमआयएमचे विरोधी पक्षनेते अब्दुल समीर साजिद बिल्डर यांनी नावावरून राजकारण नको. निवडणुका संपल्या आहेत, तुम्ही आमच्या भावनांचा आदर करा,आम्हीही तुमच्या भावनांचा आदर करू.

Jagdish Pansare

BJP aimim politics news : आपल्या भागाच्या विकास कामासाठी निधी हवा असेल तर पत्रावर औरंगाबाद नव्हे तर छत्रपती संभाजीनगर असाच उल्लेख हवा, अशी आग्रही भूमिका महापालिकेतील स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये यांनी धरला. यावर एमआयएमचे विरोधी पक्षनेते अब्दुल समीर साजिद बिल्डर यांनी नावावरून राजकारण नको. निवडणुका संपल्या आहेत, तुम्ही आमच्या भावनांचा आदर करा,आम्हीही तुमच्या भावनांचा आदर करू. शहराच्या विकासात अडसर नको, अशी भूमिका घेत निधी मागणीच्या पत्रावर छत्रपती संभाजीनगरसह कंसामध्ये औरंगाबादचा ही उल्लेख करणार असल्याचे स्पष्ट केले.

नावावरून खूप राजकारण झाले आता आपण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी या गोष्टींना थारा देता कामा नये. या शहराचे नाव जेव्हा अधिकृतपणे छत्रपती संभाजीनगर झाले नव्हते, तेव्हापासून शिवसेना-भाजप (BJP) युतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते कायम आपल्या पत्रांवर छत्रपती संभाजीनगरचा उल्लेख करायचे. माझे वडील साजिद बिल्डर हे स्थायी समितीचे सभापती असताना त्यांनी या नावावरून कधी राजकारण केले नाही. प्रत्येकाच्या वार्डासाठी विकास निधी दिला.

आमचे नेते व माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiyaj Jalil) यांनीही आपल्या आमदार, खासदार पदाच्या काळात कधीही लेटरहेडवर छत्रपती संभाजीनगर लिहिले म्हणून कोणाचे काम अडवले नाही, याची आठवणही विरोधी पक्ष नेत्यांनी भाजपला करून दिली.

राज्य सरकारने या शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर केले आहे, त्याचा आम्ही आदर करतो. स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये हे माझे चांगले मित्र आहेत त्यामुळे त्यांच्या भावनांचा मी आदर करतो. निधी मागणीसाठीच्या लेटरहेडवर छत्रपती संभाजीनगर व औरंगाबाद असा दोन्ही उल्लेख आम्ही करू. त्यामुळे ते ही आमच्या भावनांचा आदर करतील, अशी अपेक्षा मला आहे.

महापौर समीर राजूरकर व स्थायी समितीचे सभापती हे पुढारलेल्या विचारांचे आहेत. त्यामुळे विकास निधी देताना नावाच्या कारणावरून ते राजकारण करतील असे आम्हाला वाटत नाही. या शहरातील संपूर्ण भागांचा विकास झाला पाहिजे हीच आमची सर्वांची प्रामाणिक भावना असली पाहिजे, असे म्हणत विरोधी पक्षनेते अब्दुल समीर साजिद बिल्डर यांनी सामंजस्याची भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT