Chandrakant Khaire, Sandipan Bhumre sarkarnama
मराठवाडा

Sandipan Bhumre : संदिपान भूमरेंचं चंद्रकांत खैरेंना ओपन चॅलेंज; म्हणाले, "तुम्ही फक्त उमेदवारी..."

Jagdish Patil

Chhatrapati Sambhajinagar News, 28 July : शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी 'विधानसभा निवडणूक लढणार आणि गद्दारांना हरवणार', असं म्हटलं होतं. त्यांच्या याच वक्तव्यावरुन आता शिवसेना शिंदे गटाचे खासदार संदिपान भूमरे यांनी निशाणा साधला आहे.

चंद्रकांत खैरेंची (Chandrakant Khaire) हौस अजून फिटली नाही, त्यांनी फक्त पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी आणून दाखवावी असे चॅलेंज भुमरे यांनी दिलं आहे. तसंच खैरे यांनी उमेदवारी आणल्यानंतर आपण बघू की कोण कोणाला काढतं, असंही ते म्हणाले.

छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना खासदार संदिपान भूमरे (Sandipan Bhumre) म्हणाले, "तुम्ही फक्त उमेदवारी आणा त्यातच तुमची पात्रता समजेल आणि त्यानंतर तुम्हाला सांगू की संजय शिरसाट काय आहे म्हणून. खैरे यांची हौस ही फिटूच शकत नाही. त्यांनी आता फक्त नेतेगिरी करावी असा माझा सल्ला आहे. कारण खैरे यांना आता मातोश्रीवर सुद्धा कोणी विचारत नाही आणि त्यांना उमेदवारीच भेटू शकत नाही. जर यदाकदाचित खैरे उभे राहिले तर खैरेच डिपॉझिट आम्ही जप्त करू."

दम्यान यावेळी, संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी देखील चंद्रकांत खैरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, दोन वेळा खैरेंचा पराभव झालेला आहे. सहकाऱ्यांनी (म्हणजे अंबादास दानवे) यांनी त्यांचा पराभव केला आहे. त्यामुळे त्यांनी आधी त्यांचा बंदोबस्त करावा. शिवाय खैरेंनी उमेदवारी मिळवली तरच त्यांचे मातोश्रीवर किती वजन आहे हे समजेल, अन्यथा त्यांचं वजन संपलं असं जाहीर होईल, असा टोलाही त्यांनी लगावला.

मी नाराज नाही...

तसंच अब्दुल सत्तार पालकमंत्री झाले म्हणून मी नाराज नाही. मी आणि अब्दुल सत्तार दोघेही सोबत होतो आणि मुख्यमंत्र्यांनी मला विचारूनच त्यांना पालकमंत्री केलं. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्याचा प्रश्नच येत नसल्याचं ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT