Chhatrapati Sambhajinagar News, 28 July : शिवसेना (एकनाथ शिंगे गट) नेते संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. चंद्रकांत खैरेंनी विधानसभा लढवण्याचं भाष्य केलं आहे.
त्यावर बोलताना शिरसाट म्हणाले, खैरेंनी आधी त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर लढावं, ज्यांनी त्यांचा पराभव केला आहे. दोन वेळा खैरेंचा पराभव झालेला आहे. सहकाऱ्यांनी (म्हणजे अंबादास दानवे) यांनी त्यांचा पराभव केला आहे. त्यामुळे त्यांनी आधी त्यांचा बंदोबस्त करावा.
शिवाय खैरेंनी उमेदवारी मिळवली तरच त्यांचे मातोश्रीवर किती वजन आहे हे समजेल, अन्यथा त्यांचं वजन संपलं असं जाहीर होईल, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. दरम्यान, अब्दुल सत्तार (Abdul Sattar) पालकमंत्री झाल्यावर संजय शिरसाट नाराज आहेत का? असं विचारलं असता ते म्हणाले, सत्तार पालकमंत्री झाल्यानंतर माझ्यात कोणतीही नाराजी नाही. मी आणि अब्दुल सत्तार दोघेही सोबत होतो आणि मुख्यमंत्र्यांनी मला विचारूनच त्यांना पालकमंत्री केलं. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्याचा प्रश्नच येत नाही, असं स्पष्टीकरण शिरसाट यांनी दिलं.
मी कालही सांगितलं की, मनोज जरांगे यांनी चांगली भूमिका घेतली आहे. ती म्हणजे विरोधी पक्षाने त्यांची भूमिका स्पष्ट करावी. मात्र आजपर्यंत उबाठा गटातील कोणत्याही नेत्याने यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. काँग्रेस सुद्धा काही बोललं नाही आणि शरद पवारांनी त्याला साईट ट्रॅक करून बैठक घ्या, चर्चा करा असा सल्ला दिला. याचा अर्थ असा होतो की, महाविकास आघाडीला मराठा आणि ओबीसींना लढवायचं आणि राजकारण करायचं आहे.
मात्र, महायुती सामाजिक तेढ दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. मनोज जरांगे पाटलांची जी नाराजी आहे ती महाविकास आघाडीच्या विरोधात असून ते त्यांना गाढल्याशिवाय राहणार नाहीत, असंही शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले. तर यावेळी त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर बोचरी टीका केली. शिरसाट म्हणाले, "अनिल देशमुख सुद्धा आजकाल नवीन स्टोरी लिहायला लागले आहेत. जेलमधून सुटून किती दिवस झाले? त्यामुळे त्यांनाही संजय राऊत नावाचा कुत्रा चावलेला दिसतोय."
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.