Manoj Jarange News  Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange News : मनोज जरांगेंच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट, जमावाची तरुणाला बेदम मारहाण

Chhatrapati Sambhajinagar News : तरुणाने मनोज जरांगे यांच्यासोबत एक सेल्फी असलेला फोटो आपल्या व्हाॅट्सअपला ठेवला. तसेच या फोटो खाली जरांगे पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह एका ओळीची पोस्ट लिहिली.

सरकारनामा ब्यूरो

Manoj Jarange News : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जूनला घोषित होत आहे. त्याच दिवशी जरांगे पाटील मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहेत.

आंदोलनाची तयारी सुरू असतानाच धक्कादायक घटना समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्या 35 वर्षीय तरुणाला घरात घुसून 200 ते 250 जणांच्या जमावाने मारहाण केली. छत्रपती संभाजीनगर शहरात ही घटना मंगळवारी रात्री (ता.28) घडली.

मारहाण झालेल्या तरुण मुकुंदवाडी परिसरात राहणारा आहे. त्याने मनोज जरांगे Manoj Jarange यांच्यासोबत एक सेल्फी असलेला फोटो आपल्या व्हाॅट्सअपला ठेवला. तसेच या फोटो खाली जरांगे पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह एका ओळीची पोस्ट लिहिली.

या आक्षेपार्ह पोस्टचे स्क्रिनशाॅट व्हायरल झाले. त्यामुळे दीपक राहत असलेल्या मुकुंदनगरमध्ये जरांगे पाटील समर्थकांनी घरात घुसून या तरुणाला मारहाण करत मुंकदवाडी पोलिस Police ठाण्यात नेले.

या तरुणा विरोधात मुकुंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाल्यानंतर मनोज जरांगे समर्थकांनी तरुणाच्या घराची शोधाशोध सुरू केली होती.

मुकुंदनगरमधील त्याच्या घराची माहिती कळताच तब्बल 200 ते 250 जणांचा जमाव तरुणाला घरात घुसून त्याला मारहाण करत घराबाहेर काढले. रात्री उशीरा तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जरांगे पाटलांच्या समर्थकांनी संबंधित तरुणाला माफी मागायला लावली. 'माझ्या कडून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली होती. ती नजरचुकीने झाली होती. या बद्दल मी मराठा समाजाची माफी मागतो, या शब्दांत तरुणाने माफी मागितली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT