MNS Vs BJP News : लोकसभेच्या निकालाआधीच मनसेच्या इंजिनने दिशा बदलली; अन् भाजपकडूनही शुभेच्छा...

MLC Election News : विधानपरिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेने अभिजीत पानसे यांची उमेदवारी जाहीर करून पहिला डाव टाकला. त्यानंतर ही जागा आमच्या हक्काची असल्याचे स्पष्ट करत भाजपनेही या मतदारसंघावर दावा ठोकला.
Raj Thackeray, Ashish Shelar
Raj Thackeray, Ashish ShelarSarkarnama
Published on
Updated on

Konkan Graduate Constituency : लोकसभा निवडणुकीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. त्यानंतर मुंबईत झालेल्या पाचव्या टप्प्यातील सांगता सभेत राज यांना मानाचे स्थान दिल्याचेही महाराष्ट्राने पाहिले. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींकडे हक्काने काही मागण्याही केल्या. त्यामुळे मनसे आता महायुतीचा अविभाज्य घटक झाल्याची चर्चा होती. मात्र लोकसभेचा निकाल लागण्यापूर्वीच मनसे आणि भाजपात विधानपरिषद निवडणुकीवरून खटके उडू लागल्याचे दिसून येत आहे. MNS Vs BJP News

विधानपरिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेने अभिजीत पानसे Abhijeet Panse यांची उमेदवारी जाहीर करून पहिला डाव टाकला. त्यानंतर ही जागा आमच्या हक्काची असल्याचे स्पष्ट करत भाजपनेही या मतदारसंघावर दावा ठोकला. येथून भाजपचे निरंजन डावखरे हे सिटिंग आमदार आहेत. असे असतानाही मनसेने आपला उमेदवार जाहीर केला. यावर भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलारांनी मनसेला जाहीरपणे शुभेच्छा दिल्या. त्यामुळे येथून भाजप आणि मनसेचे उमेदवार रिंगणात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मनसेकडून कोकण पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केल्यानंतर अभिजीत पानसेंनी राज ठाकरेंनी Raj Thackeray माझे नाव घेतल्याचे स्पष्ट केले. तर, लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकांत हिंदुत्त्वासाठी मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. मात्र त्यावर आमचा पक्ष चालणार आहे का? असा खडा सवालच अविनाश जाधवांनी उपस्थित केल्याने राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या. तसेच त्यांनी आता भाजपने आम्हाला पाठिंबा द्यावा, अशीही अपेक्षा व्यक्त केली. यावर भापनेही या निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट करताना येथून लढण्याचा दावा केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Raj Thackeray, Ashish Shelar
Pune Hit And Run Case Update : डॉ. तावरे, हाळनोरच्या डोक्यावर निलंबनाची टांगती तलवार; पोलिसांचा प्रस्ताव तयार

आशिष शेलार Ahish Shelar म्हणाले, विधानपरिषद निवडणुकीत कोकण पदवीधर मतदारसंघ ही आमच्या हक्काची जागा आहे. येथून निरंजन डावखरे हे भाजपाचे सिटींग आमदार आहेत. सिटिंगच्या नियमानुसार ही जागा आम्हीच लढणार आहोत. त्यामुळे मनसेला आमच्या शुभेच्छा.., अशी थेट भूमिका घेत शेलारांनी विधानपरिषदेत मनसेला आव्हान दिल्याचे बोलले जात आहे. तसेच शेलारांच्या भूमिकेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनीही समर्थन केले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Raj Thackeray, Ashish Shelar
Rahul Gandhi Vs Narendra Modi : होय.. नरेंद्र मोदींना देवानं पाठवलंय! पण कशासाठी...; राहुल गांधींची बोचरी टीका

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com