Sanjay Shirsat | Atul Save News Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Shirsat On Water Issue : लोक आम्हाला जोड्याने मारतील! पाणीप्रश्नावर संजय शिरसाट यांनी व्यक्त केली भिती..

Sanjay Shirsat has raised concerns about the looming water crisis in Chhatrapati Sambhajinagar, warning that it could turn into a major political challenge for the ruling party. : राज्यात बहुमताची सत्ता, जिल्ह्यात सगळे आमदार, खासदार निवडून दिले, जिल्ह्यात दोन मंत्री आहेत, तरीही आम्ही या दिवसापासून नागरिकांना दररोज पाणी देऊ, हे कोणीच ठामपणे सांगू शकत नाहीये.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagr : महापालिकेत पंचवीस वर्ष सत्ता भोगूनही नागरिकांना दररोज पाणीपुरवठा करण्यात सत्ताधाऱ्यांना यश आले नाही. दुसरीकडे विरोधकही सत्ताधाऱ्यांवर अंकूश ठेवू शकली नाही. परिणामी संभाजीनगरकरांच्या नळातून तब्बल पंधरा दिवसांनी एकदा पाणी येते. संमातर जलवाहिनी योजना बासनात गेली, तर 2018 ध्ये मंजूर झालेली नवी पाणी योजना सात वर्ष झाली तरी पूर्ण झालेली नाही. आता याचे नेमके अपयश कोणाचे? सत्ताधाऱ्यांचे की, त्यांना पुन्हा पुन्हा निवडून देणाऱ्या जनतेचे?हा खरा प्रश्न आहे.

या सगळ्या उजळणीचे कारण म्हणजे आगामी महापालिका (Municipal Corporation) निवडणुकीत पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांना शहराचा पाणीप्रश्न सतावणार आहे. राज्यात बहुमताची सत्ता, जिल्ह्यात सगळे आमदार, खासदार निवडून दिले, जिल्ह्यात दोन मंत्री आहेत, तरीही आम्ही या दिवसापासून नागरिकांना दररोज पाणी देऊ, हे कोणीच ठामपणे सांगू शकत नाहीये. राज्याचे ओबीसी मंत्री अतुल सावे, सामाजिक न्याय तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी एप्रिल-जून 2025 असे दोन स्वतंत्र मुहूर्त दिले.

परंतु, आता हा मुहूर्त देखील हुकण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महापालिका, जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्यवयाचा आभाव, कंत्राटदाराकडून वाचला जाणार अडचणींचा पाढा पाहता, संभाजीनगरकरांचा पाण्यायासाठीचा टाहो कधी थांबणार? यावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. आता डिसेंबर अखेर पाणीपुरवठा योजना पूर्ण होईल, असे सांगितले जात आहे. या संदर्भात पालकमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी संताप व्यक्त केला. असे झाले तर लोक आम्हाला जोड्याने मारतील, अशी भिती त्यांनी व्यक्त केली.

एप्रिल अखेरीस संभाजीनगरच्या नागरिकांना दोन दिवसाआड पाणी मिळेल, असा दावा संजय शिरसाट यांनी पालकमंत्री होताच केला होता. मी जे सांगतो तेच करतो, अधिकाऱ्यांना तशा सूचना मी दिल्या आहेत, असे शिरसाट यांनी सांगतिले होते. तर जूनअखेरीस योजना पूर्ण होईल, असे मंत्री अतुल सावे यांनी म्हटले होते. दोन मंत्र्यांनी स्वतंत्र दावे केल्यामुळे या पाणी योजनेचे नेमके काय सुरू आहे? याचा अंदाज येतो. आता याच पाणीप्रश्नावर राजकारणही सुरू झाले आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून लवकरच शहरात हंडा मोर्चा काढण्यात येणार आहे. आदित्य ठाकरे या मोर्चासाठी येणार असल्याची माहिती आहे. याआधी महाविकास आघाडीचे सरकार आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने महापालिकेवर हंडा मोर्चा काढला होता. आता विरोधक असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून हंडा मोर्चा निघणार आहे.

राजकीय पक्ष अन् त्यांच्या नेत्यांच्या या हंडा मोर्चाने काही साध्य होत नाही, हे पंचवीस वर्षात शहरवासियांना पाणी मिळू शकले नाही, यावरून सिद्ध झाले आहे. आता आणखी एक हंडा मोर्चा निघणार आहे. पण तुझ्या घरात नाही पाणी, घागर उताणी रे.. असेच म्हणावे लागेल. संजय शिरसाट यांनी व्यक्त केलेली भिती पाण्यावाचून घशाला कोरड पडलेल्या नागरिकांकडून खरी न ठरो, हीच अपेक्षा.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT