Chhatrapati Sambhajinagar News : महापालिकेने अतिक्रमण काढले, बेघरांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल मांडली!

Homeless people staged a protest outside the district collector office after being evicted. They cooked food on the road : हर्सुल येथील गट क्रमांक 216 व 217 येथील गायरान जमीनीवर बेघर लोक रहात होते. प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रम हटाव पथकाने दोन दिवसांपूर्वी पाडापाडी करुन जागा रिकामी करुन घेतली.
Protest In Front Of Collector Office News
Protest In Front Of Collector Office NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada News : पंतप्रधान आवास योजनेसाठी अतिक्रमण काढण्याची कारवाई केल्यानंतर हर्सुल येथील मुलनिवासीनगरातील बेघरांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे निवारा मिळण्यासाठी आंदोलन सुरु केले. बेघरांनी रस्त्यावरच चूली मांडत स्वयंपाक केला आणि कारवाईचा निषेध केला. बेघरांनी आपलं सगळं बिऱ्हाडचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मांडल्याने प्रशासनाची मोठी कोंडी झाली आहे.

हर्सुल येथील गट क्रमांक 216 व 217 येथील गायरान जमीनीवर बेघर लोक रहात होते. प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रम हटाव पथकाने दोन दिवसांपूर्वी पाडापाडी करुन जागा रिकामी करुन घेतली. यामुळे येथील रहिवाशांनी पिपल्स पार्टी ऑफ इंडिया ( डेमोक्रॅटिक)च्या नेतृत्वात (Collector) जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन सुरु केले आहे.

यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांना निवेदन देण्यात आले आहे. या बेघरांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे संसार थाटला असून आम्ही बेघर आहोत, आमची राहण्याची सोय होईपर्यंत इथेच स्वयंपाक करुन खातो, असे म्हणत चुली पेटवून स्वयंपाकही केला. (Chhatrapati Sambahjinagar) इथेच हे आंदोलक मुक्कामही करत असल्याने त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावा, अशी मागणी केली जात आहे.

Protest In Front Of Collector Office News
Beed District Collector: जिल्हाधिकाऱ्यांना अटक करा, कोर्टाच्या आदेशाने खळबळ... नेमकं प्रकरण काय?

संविधानाच्या कलम 21 नुसार देशातील प्रत्येक नागरीकाला सन्मानाने जगण्याचा मुलभूत अधिकार आहे. या सन्मानाच्या जगण्याच्या मुलभूत अधिकारात निवारादेखील आहे. मुलनिवासीनगरातील आम्ही रहिवासी बेघर असल्याने 2010 पासून या गायरानात राहत आहोत, आम्हाला हक्काचे घर मिळावे म्हणून सरकार दरबारी सातत्याने प्रयत्न करत असताना घर मिळणे दूरच पण पुन्हा बेघर व्हावे लागले आहे.

Protest In Front Of Collector Office News
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation : विधानसभेला जागा वाढताच भाजपकडून स्वबळाचा नारा!

आम्हाला हक्काचा निवारा देण्यात यावा, अशी मागणी आंदोलकांनी निवेदनाद्वारे केली आहे. आमचं घर पडल्यावर आम्ही कुठे जायचं? असा प्रश्न उपस्थित करत या नागरिकांनी संभाजीनागर जिल्हाधीकारी कार्यालयासमोर कालपासून कुटुंबासह ठिय्या दिला आहे. यावर प्रशासन काय निर्णय घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com