छत्रपती संभाजीनगर येथील पाणीपुरवठा योजनेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला आहे.
योजनेचा खर्च वाढवून मंत्री, आमदार आणि संबंधित अधिकाऱ्यांनी गैरव्यवहार केल्याचा गंभीर दावा करण्यात आला.
या प्रकरणाची चौकशी राज्याच्या एसीबीऐवजी केंद्राच्या सीबीआयकडून करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation News : छत्रपती संभाजीनगर शहरातील जनता गेल्या अनेक वर्षापासून पाण्यासाठी टाहो फोडती आहे. सत्ताधारी मात्र पाणीपुरवठा योजना आणल्याचे श्रेय घेत स्वतःची पाठ थोपटवून घेत आहेत. पण अजूनही पूर्ण न झालेल्या या योजनेची किमंत कोट्यावधीने वाढवून पाणीपुरवठा मंत्री, आमदार व इतर सगळ्यांनीच मोठा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केला.
या घोटाळ्याची चौकशी ही राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून नाही, तर केंद्राच्या म्हणजेच सीबीआयकडून केली जावी, अशी मागणी इम्तियाज यांनी केली आहे. कोणत्याही योजनेची मुळ किंमत ही पाच ते दहा टक्के वाढली हे समजू शकतो, परंतु इथल्या सगळ्याच पक्षाच्या सत्ताधाऱ्यांनी कोट्यावधी रूपयांनी योजनेची किमंत वाढवून मलिदा लाटला आहे. पाणीपुरवठा मंत्री तर यात मालामाल झाल्याचा आरोप त्यांनी केला.
राज्याच्या अॅन्टी करप्शन ब्युरो कडून या योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करू नये, कारण त्यांच्यावर मंत्र्यांचा दबाव आहे. सीबीआयकडूनच या पाणी योजनेची चौकशी झाली तर सत्य काय आहे? हे जनतेसमोर येईल.
हैदराबादच्या कंपनीला हे कंत्राट दिले गेले. पन्नास किलोमीटरवरून जलवाहिनीतून शहरात पाणी आणायचे आहे. शहरातील जुनी जलवाहिनी दुरूस्त करून 52 पाण्याच्या टाक्या उभारण्याचे या योजनेत ठरवण्यात आले. परंतु ही योजना इतकी रखडली की 1870 कोटींची ही योजना आता तीन हजार कोटींवर जाऊन पोहचली आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात याजनेचा खर्च कसा वाढला? त्यात कोणी, कसा भ्रष्टाचार केला? हे सगळ्यांना माहिती आहे. मी जर खोटं बोलत असेल, चुकीचे आरोप करत असेल तर माझ्यावर कारवाई करा, असे आव्हानच इम्तियाज जलील यांनी सताधाऱ्यांना दिले आहे.
एमआयएम पक्षाच्या विरोधी पक्षनेते पदी अब्दुल समीर साजेद बिल्डर यांनी आज पदभार स्वीकारला. यावेळी इम्तियाज जलील यांनी पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत वरील मागणी केली.
1. कोणत्या योजनेवर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे?
छत्रपती संभाजीनगर येथील पाणीपुरवठा योजनेवर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे.
2. आरोप कोणी केला आहे?
एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी हा आरोप केला आहे.
3. आरोपाचा मुख्य मुद्दा काय आहे?
योजनेचा खर्च कोट्यवधींनी वाढवून मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे.
4. चौकशीबाबत काय मागणी करण्यात आली आहे?
राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाऐवजी सीबीआयकडून चौकशी करावी, अशी मागणी आहे.
5. या प्रकरणाचा पुढील परिणाम काय होऊ शकतो?
राजकीय वाद तीव्र होण्याची शक्यता असून चौकशीबाबत सरकारची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.