Imtiaz Jaleel On Sanjay Shirsat : पालकमंत्री संजय शिरसाट यांचे गैरव्यवहार बाहेर काढल्यानंतर माझ्यावर अॅट्राॅसिटी; इम्तियाज जलील यांचा न्यायालयात युक्तीवाद!

Atrocity Case News : जमीन गैरव्यवहार उघड केल्याने आपल्यावर अॅट्राॅसिटी गुन्हा दाखल झाल्याचा दावा करत इम्तियाज जलील यांनी न्यायालयात स्वतः युक्तीवाद केला असून पुढील सुनावणी 21 फेब्रुवारीला आहे.
AIMIM leader and former MP Imtiaz Jaleel presenting arguments in court over the atrocity case linked to allegations against Guardian Minister Sanjay Shirsat.
AIMIM leader and former MP Imtiaz Jaleel presenting arguments in court over the atrocity case linked to allegations against Guardian Minister Sanjay Shirsat.Sarkarnama
Published on
Updated on

Court News : पालकमंत्र्यांच्या जमीनचा गैरव्यवहार बाहेर काढल्यामुळे आपल्याविरोधात अॅट्राॅसिटी गुन्हा दाखल केल्याचा दावा करत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलिल यांनी अप्पर सत्र न्यायाधीश रा. दा. पाटील यांच्या न्यायालयात मंगळवारी (ता. 10) स्वतः युक्तीवाद केला. आता या प्रकरणावर 21 फेब्रुवारी रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे.

पालकमंत्री व त्यांच्या मुलाचे जमीन गैरव्यवहार प्रकरण जनसामान्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजीत केली होती. पत्रकार परिषदेत आपण केवळ एका सरकारी कागदपत्राचे वाचन केले. आपला एखाद्या समुदायाला दुखावण्याचा उद्देश नव्हता. परंतु आपल्याला शांत बसवण्यासाठी माझ्याविरुद्ध ऑगस्ट महिन्यात बेगमपुरा व क्रांतीचौक पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती व जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्राॅसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे युक्तिवाद इम्तियाज जलील यांनी केला.

न्यायालयात पार्टी इन पर्सन नुसार इम्तियाज जलील यांनी स्वत: युक्तिवाद करत वरील गुन्ह्यातून मुक्त करण्याची विनंती केली. यासाठी त्यांनी सुमारे 20 मिनिटे युक्तिवाद करताना माझादेवी विरुद्ध ओंकारदीप अहलुवालिया, कर्नाटकातील प्रकरणांचा दाखल देत व केंद्र सरकारने राज्याच्या समाजकल्याण मंत्रालयास पाठवलेल्या पत्रात नमूद बंदी असलेल्या शब्दाकडे लक्ष वेधून ही पत्रेही सादर केली.

AIMIM leader and former MP Imtiaz Jaleel presenting arguments in court over the atrocity case linked to allegations against Guardian Minister Sanjay Shirsat.
ZP Panchayat Samiti Election Result LIVE : पंतप्रधान मोदींचं झेडपी अन् पंचायत समित्यांच्या निवडणुकांमधील महायुतीच्या दणदणीत विजयानंतर ट्विट, म्हणाले..

आपल्याविरुद्ध दाखल तक्रारींमध्ये आपण मुस्लिम धर्माचे असल्याचेही नमूद केल्याकडे इम्तियाज जलील यांनी लक्ष वेधले. दोन माध्यम वाहिन्यांमध्ये वारंवार आपल्या पत्रकार परिषदेतील नेमक्या शब्दांचा वापर केलेला दाखवण्यात आला, असला तरी आपण केवळ एकदाच सरकारी पत्रातील त्या एका शब्दाचा वापर केल्याचे इम्तियाज जलील यांनी सांगीतले.

AIMIM leader and former MP Imtiaz Jaleel presenting arguments in court over the atrocity case linked to allegations against Guardian Minister Sanjay Shirsat.
Abdul Sattar : अब्दुल सत्तारांच्या दुसऱ्या मुलाचेही सुरक्षित राजकीय लॉन्चिंग; विजयासह झेडपीत दमदार एन्ट्री!

मात्र यावेळी सरकारी वकील सतीश मुंदवाडकर यांनी सदर प्रकरणात फिर्यादीचे म्हणणे ऐकल्याशिवाय न्यायालयाने कुठलाही निर्णय देऊ नये, असा अर्ज सादर केला. त्यामुळे या प्रकरणावर आता 21 फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी ठेवण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com