ZP Election Chhatrapati Sambhajinagar Sarkarnama
मराठवाडा

bjp ZP Politics : झेडपीत मित्रपक्ष शिवसेनेसह उद्धव ठाकरेंच्या पक्षाला धोबीपछाड; आता सभापती पदासाठीही भाजप लागली कामाला!

BJP ZP Election Politics : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा भाजप कामाला लागली असून सत्तेत बसू पाहणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का देण्याच्या तयारीत आहे.

Jagdish Pansare

  1. संभाजीनगर जिल्हा परिषदेत भाजपने अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदे बिनविरोध जिंकून सत्ता मजबूत केली.

  2. शिवसेना आणि उद्धव ठाकरे गटाला या राजकीय घडामोडीत मोठा धक्का बसला आहे.

  3. भाजपने बहुमत टिकवण्यासाठी सदस्यांना सहलीवर पाठवून रणनीती आखली आहे.

Chhatrapati Sambhajinagar News : नवनाथ इधाटे

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत मित्रपक्ष शिवसेना आणि त्यांना साथ देऊन सत्तेत बसू पाहणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला भाजपने धोबीपछाड दिले आहे. एकीकडे अध्यक्ष, उपाध्यक्ष ही दोन्ही पदे बिनविरोध आपल्याकडे राखल्यानंतर आता दुसरीकडे भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आपला मोर्चा विषय समिती सभापती पदाच्या बांधणीकडे वळवला आहे. मिनी मंत्रालयात शतप्रतिशत सत्ता राखण्यासाठी भाजपने पुन्हा एकदा आपल्या सदस्यांसह पाठिंबा देणाऱ्या पक्षांचे 35 सदस्यांना सहलीवर पाठवले आहे.

अध्यक्ष, उपाध्यक्ष पद स्वतःकडे खेचल्यानंतर भाजपला विषय समित्यांवरही आपल्याच पक्षाचे वर्चस्व राखायचे आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीवेळी डाव उधळला गेल्यामुळे शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष अलर्ट झाला आहे.

त्यावेळी आलेले अपयश धुवून टाकण्यासाठी पक्षही सरसावले आहेत. यामुळे कुठल्याही प्रकराची जोखीम नको म्हणून भाजपच्या नेत्यांनी सदस्यांना सहलीवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. आता प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी हे सदस्य शहरात परत येतील.

जिल्हा परिषदेमध्ये विषय समितीच्या सभापती पदाच्या निवडीपूर्वी राजकीय हालचालींना वेग आला असून भाजपने पुन्हा एकदा ‘सहलीचा फॉर्म्युला’ अॅक्टिव्ह केला आहे. उद्या, 2 एप्रिल रोजी होणाऱ्या सभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेतील सुमारे 35 सदस्यांना सोमवारी सहलीवर पाठविण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेमधील भाजपचे 25 सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 4 सदस्य तसेच अपक्ष व इतर पक्षांचे 6 सदस्य असे एकूण 35 सदस्य सहलीवर रवाना करण्यात आले आहेत. सभापती निवडीच्या वेळी कोणत्याही प्रकारचा राजकीय उलटफेर होऊ नये, तसेच मतदानाच्या दिवशी सर्व सदस्य एकत्र राहावेत यासाठी ही रणनीती आखण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सदस्यांना जिल्ह्याबाहेरील सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आल्याची चर्चा आहे.

विशेष म्हणजे, जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीत देखील भाजपने याच सहलीच्या फॉर्म्युल्याचा अवलंब केला होता. त्यावेळी आपल्या समर्थक सदस्यांना एकत्र ठेवण्यासाठी सहलीचा पर्याय निवडण्यात आला होता. त्यानिवडीत भाजपला यश मिळाले असून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष दोन्ही पदांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे आता सभापती पदाच्या निवडीसाठीही भाजपने तोच फॉर्म्युला पुन्हा अॅक्टिव्ह केला आहे.

शिवसेनेचे कोंडी?

भाजपने जिल्हा परिषदेत अध्यक्ष उपाध्यक्ष च्या निवडणुकीत दोन्ही पदे आपल्याकडे ठेऊन शिवसेनेची कोंडी केली होती. तोच फॉर्म्युला आता पुन्हा राबविण्यासाठी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्षसह इतर पक्षाचे काही सदस्य मिळून सुमारे 35 सदस्य सहलीवर गेले आहे. त्यामुळे शिवसेनेची कोंडी होण्याची शक्यता आहे.

FAQs :

1. ही घटना कुठे घडली?
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत ही राजकीय घडामोड घडली.

2. कोणत्या पक्षाला फायदा झाला?
भाजपला या घडामोडीत मोठा फायदा झाला.

3. विरोधकांना काय धक्का बसला?
शिवसेना आणि उद्धव ठाकरे गटाला सत्ता गमवावी लागली.

4. भाजपने कोणती रणनीती वापरली?
सदस्यांना सहलीवर पाठवून बहुमत टिकवण्याचा प्रयत्न केला.

5. या घडामोडीचा परिणाम काय होईल?
स्थानिक राजकारणात भाजपची पकड अधिक मजबूत होऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT