Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरात 'मेड इन पाकिस्तान'; सौदर्य प्रसाधनांच्या विक्रीने खळबळ, मनसेकडून प्रकार उघडकीस!

Made in Pakistan Cosmetics MNS : छत्रपती संभाजीनगरमधील बाजारपेठेत चक्क 'मेड इन पाकिस्तान' लिहिलेली सौंदर्य प्रसाधने विक्री केली जात असल्याचा प्रकार मनसेने उघडकीस आणला.
Chhatrapati Sambhajinagar News
Chhatrapati SambhajinagarSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये चाललंय काय? असा प्रश्न पडावा असा खळबळजनक प्रकार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी समोर आणला आहे. आपल्या देशावर दहशतवादी हल्ले करणाऱ्या शत्रू राष्ट्र पाकिस्तानमध्ये तयार झालेली उत्पादने चक्क छत्रपती संभाजीनगरमध्ये विकली जात आहेत. सौदर्य प्रसाधने असलेल्या या वस्तुंवर 'मेड इन पाकिस्तान' असा उल्लेख असून या संदर्भात मनसेने पोलीसांकडे धाव घेतली आहे.

शहरातील गुलमंडी, सिटीचौक भागात मोठ्या प्रमाणावर सौंदर्य प्रसाधन साहित्य विक्रीची दुकाने आहेत. शहराचे हदयस्थान अशी ओळख असलेल्या या भागात शहर आणि आसपासच्या भागातील नागरिक खरेदीसाठी येत असतात. सौंदर्य प्रसाधन वस्तुंची शेकडो दुकाने या ठिकाणी असल्याने महिलांची मोठी गर्दी खरेदीसाठी असते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास एक धक्कादायक प्रकार आला. या बाजारपेठेत चक्क 'मेड इन पाकिस्तान' लिहिलेली सौंदर्य प्रसाधने विक्री केली जात होती. विविध प्रकारच्या क्रीम व इतर वस्तूंवर त्या पाकिस्तानमध्ये तयार केल्याचा उल्लेख आहे. या वस्तु मनसैनिकांनी ताब्यत घेत थेट पोलीस आयुक्तालय गाठले. 'मेड इन पाकिस्तान' वस्तू आपल्या देशात आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये कशा आल्या?

Chhatrapati Sambhajinagar News
Pankaja Munde News: राजकारण सोडल्यानंतर काय करणार? भागवत कथेत पंकजा मुंडे म्हणाल्या...

आज सौंदर्य प्रसाधनाच्या वस्तु आल्या, उद्या यातून आणखी काही, स्फोटके किंवा घातक वस्तू येऊ शकतात, अशी भिती मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. पोलीस आयुक्त कार्यालयात या संदर्भात तक्रार देण्यात आली आहे. पाकिस्तानात तयार वस्तूंच्या विक्रीवर तात्काळ बंदी घालावी, अशी मागणी त्यांनी केली.

शहराच्या सुरक्षेला धोका

प्रशासनाने तातडीने बाजारपेठेतील दुकानांची झाडाझडती घेऊन 'मेड इन पाकिस्तान'च्या वस्तू ताब्यात घ्याव्यात, संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आम्ही खळखट्याकला तयार आहोत, असा इशाराही मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. सध्या लग्नसराईचे दिवस आहेत, या शिवाय विविध सण येणाऱ्या काही दिवसात आहेत, अशावेळी पाकिस्तानमध्ये तयार झालेल्या वस्तूंची विक्री शहरात होणे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे मनसेचे मत आहे.

Chhatrapati Sambhajinagar News
जगाला धडकी भरवणारी क्षेपणास्त्रे कोणत्या देशाकडे आहेत जास्त? भारताचा क्रमांक पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com