Chhatrapati Sambhajinagar ZP Election Politics; Sachin Garad sarkarnama
मराठवाडा

ZP Politics : एका मताच्या विजयाने थेट अर्थ व बांधकाम सभापती पदाला गवसणी; भाजप सदस्याची लॉटरी लागली!

Chhatrapati Sambhajinagar ZP Election Politics : राजकारणात मिळालेला विजय हा एक मताने असो किंवा तो मोठ्या फरकाने मात्र विजय हा विजय असतो.

Jagdish Pansare

  1. संभाजीनगर जिल्हा परिषदेत सचिन गरड यांनी एका मताने विजय मिळवला.

  2. त्यांच्या या विजयामुळे सत्तासमीकरणात त्यांचे महत्त्व वाढले आहे.

  3. एका मताचा विजयही राजकारणात किती प्रभावी ठरू शकतो याचे हे उदाहरण आहे.

Chhatrapati Sambhajinagar News : राजकारणात मिळालेला विजय मग तो लाखो मतांनी असो की केवळ एका मताने त्याचे महत्व सारखेच आणि परिणामही सारखाच असतो. पण जेव्हा सत्ता समीकरण जुळविण्याची वेळ येते तेव्हा एका मताने विजयी झालेल्या व्यक्तीचे महत्व अधिकच वाढते. असाच अनुभव सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या वडगाव कोल्हाटी गटातून विजयी झालेले भाजप पुरस्कृत सदस्य सचिन कल्याणराव गरड हे घेत आहेत.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपने युती केली. पण प्रत्यक्षात उमेदवारी दाखल करताना दोन्ही पक्षाकडून आप आपल्या इच्छुकांना बी फॉर्म देऊन युतीला हरताळ फासण्यात आला.

वडगाव कोल्हाटीमध्ये ऐनवेळी भाजपकडून इच्छुक असलेल्या सचिन गरड यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात अपक्ष म्हणून लढावे लागले. विशेष म्हणजे ही निवडणूक इतकी अटीतटीची झाली, की सचिन गरड यांचा केवळ एका मताने विजय झाला.

हजारोंच्या मताधिक्याने विजयी झालेल्या उमेदवाराचा जल्लोष फिका पडावा, असा जल्लोष तेव्हा गरड समर्थकांनी मिरवणुकीत केला होता. पुढे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीत राजकीय समीकरण बदलली.

भाजप-शिवसेनेत फाटले अन् वेगळ्याच प्रयोगाच्या हालचाली सुरू झाल्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सदस्यांच्या पाठिंब्यावर शिवसेना भाजपला सत्तेपासून बाहेर ठेवण्याच्या प्रयत्नात होती. पण भाजपने हा डाव उधळून लावला.

भाजपने स्वबळावर सत्ता स्थापनेचा दावा केला तेव्हा एका मताने विजयी झालेल्या सचिन गरड यांनी भाजपला साथ देण्याची भूमिका घेतली. मी अपक्ष लढलो असलो तरी मी भाजपचाच आहे, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली. अध्यक्ष, उपाध्यक्ष बिनविरोध निवडून आल्यानंतर आज झालेल्या विषय समिती सभापती पदाच्या निवडीत पक्षाने गरड यांनी केलेल्या मदतीची परतफेड केली.

सचिन गरड यांना थेट अर्थ व बांधकाम सारख्या महत्त्वाच्या सभापती पदाचा मान देत त्यांच्या एका मताने मिळालेल्या विजयाची आब भाजपने राखली आहे. पक्षाने दिलेली ही जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडू, असा विश्वास व्यक्त करतानाच तेव्हा जर एका मताने मी विजयी झालो नसतो, तर आज सभापती पदाची संधी मिळाली नसती अशी कबुली गरड यांनी बिनविरोध निवडीनंतर दिली.

FAQs :

1. सचिन गरड कोण आहेत?
ते संभाजीनगर जिल्हा परिषदेतील भाजपा पुरस्कृत सदस्य आहेत.

2. त्यांनी किती मतांनी विजय मिळवला?
त्यांनी केवळ एका मताने विजय मिळवला.

3. या विजयाचे महत्त्व काय आहे?
सत्तासमीकरणात त्यांची भूमिका महत्त्वाची बनली आहे.

4. हा कोणत्या गटातील निकाल आहे?
वडगाव कोल्हाटी गटातून हा निकाल लागला.

5. या घटनेतून काय शिकायला मिळते?
एका मताचेही लोकशाहीत प्रचंड महत्त्व असते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT