Political tension between Shiv Sena and BJP intensifies in Chhatrapati Sambhajinagar after Panchayat Samiti chairman elections, ahead of crucial Zilla Parishad president selection. Sarkarnama
मराठवाडा

ZP Election : पंचायत समितीत मोठा भाऊ ठरलेल्या शिवसेनेला सभापती पदापासून भाजपाने रोखले, जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीत शिंदेसेना हात दाखवणार?

Chhatrapati Sambhajinagar Politics : समिती सभापती निवडीत भाजपाने विरोधकांशी हातमिळवणी केल्याने शिवसेनेत नाराजी वाढली असून छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीत सत्तासमीकरण बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Jagdish Pansare

Shivsena-BJP News : छत्रपती संभाजीनगर महापालिकेत बहुमतापासून एका मताने दूर असलेल्या भाजपाला महाविकास आघाडीतील पक्षांनी पाठिंब्याची तयारी दर्शवली होती. विशेष म्हणजे बिनशर्त हा पाठिंबा असणार होता. परंतु भाजपाने मित्रपक्ष शिवसेनेला सोबत घेत उपमहापौरपद दिले. भाजपाने दाखवलेल्या या मनाच्या मोठेपणाचे कौतुकही झाले.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्वाधिक 23 सदस्य निवडून आणत भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. पंचायत समिती निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 55 जागा जिंकत शिवसेनेने भाजपाला दुसऱ्या क्रमांकावर ढकलले. त्यांच्या वाट्याला 38 जागा आल्या. पण सभापती पदाच्या निवडीत भाजपाने कुठे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, तर कुठे थेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी युती करत नऊ पैकी सहा सभापती पद पटकावली. तर शिवसेनेला तीन ठिकाणी सभापती करता आले.

राज्याच्या सत्तेत युती असताना भाजपाने स्थानिक पातळीवरच्या निवडणुकीत युतीधर्म न पाळता फुलंब्री, खुलताबाद येथे सभापती पदासाठी विरोधकांशी हातमिळवणी केली. याबद्दल शिंदेंच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. फुलंब्रीमध्ये भाजपा आमदार अनुराधा चव्हाण, गंगापूर-खुल्ताबादमध्ये आमदार प्रशांत बंब यांनी महायुतीला तडा जाईल असा निर्णय घेतल्याचा आरोप होत आहे.

या राजकीय खेळीचा बदला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडीवेळी घेण्याच्या जोरदार हालचाली शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, काँग्रेस या पक्षांनी सुरू केल्या आहेत. या पक्षाचे प्रयत्न यशस्वी झाले तर सर्वाधिक जागांसह नंबर एकचा पक्ष ठरलेल्या भाजपालाच सत्तेबाहेर थांबावे लागू शकते.

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड 18 मार्चला केली जाणार आहे. बहुमतासाठी 32 सदस्यांची गरज असताना भाजपकडे पुरस्कृतांसह 24, तर राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे 4 सदस्य आहेत. दुसरीकडे शिंदेसेना, उद्धवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि अपक्ष मिळून 35 सदस्यांचे संख्याबळ आहे. 2017 मध्ये तत्कालीन काँग्रेसचे नेते आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्याची खेळी केली होती.

त्यामुळे सर्वाधिक सदस्य निवडून आलेले असताना काँग्रेसच्या मदतीने शिवसेनेला अध्यक्षपद मिळाले होते. तर दुसऱ्या टर्ममध्ये हे पद काँग्रेसच्या वाट्याला आले होते. 2026 मध्ये याची पुनरावृत्ती होते, की मग महायुतीचे राज्यातील नेते स्थानिक नेत्यांची नाराजी दूर करत दिलजमाई घडवू आणते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT