Ekanath Shinde, dyanraj Chougule  Sarkarnama
मराठवाडा

Eknath Shinde : सायंकाळच्या लग्न सोहळ्याला मुख्यमंत्री शिंदेंची रात्री साडेबाराला हजेरी

Political News : आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या मुलाच्या शाही विवाह समारंभाला मान्यवरांनी हजेरी लावली.

सरकारनामा ब्यूरो

अविनाश काळे

Omraga News : शिवसेना शिंदे गटाचे कोल्हापूर येथे शुक्रवारी व शनिवारी दोन दिवस अधिवेशन पार पडले. या अधिवेशनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजर होते. त्यामुळे या दोन दिवसाच्या बिझी शेड्यूलमधुन वेळ काढून उमरगा येथील विवाह सोहळ्याला शनिवारी रात्री साडेबारा वाजता हजेरी लावली.

उमरगा, लोहारा तालुक्याचे शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले यांचे चिरंजीव शुभम व धाराशिवचे प्राचार्य मारूती शेरखाने यांची कन्या डॉ. स्नेहा या वधूवराला त्यांनी शुभाशिर्वाद दिले. यावेळी राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उमरगा शहरातील श्री. छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या (कै.) शिवाजीराव (दाजी) मोरे क्रीडा संकुलाच्या मैदानावर विवाह समारंभाच्या निमित्ताने अयोध्यातील श्रीराम मंदिराची उभारण्यात आलेली प्रतिकृती सर्वांचे लक्ष वेधुन घेणारी होती. सायंकाळी सात वाजुन ११ मिनीटाच्या गोरज मुहुर्तावर अक्षता झाल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) कोल्हापूर येथे पक्षाचे अधिवेशन करुन तेथून रात्री आठ वाजता बिदर (कर्नाटक) येथील विमानतळावर येणार होते. मात्र, कार्यक्रमाला उशीर झाल्याने ते बिदरला रात्री साडेदहाला पोहचले, तेथून मोटारीने विवाहस्थळी साडेबाराला पोहचले.

त्यांच्यासोबत माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड (Ravindra Gaikwad ), बस्वकल्याणचे आमदार शरणु सलगर होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी कॉलेजमधील शिवरायाच्या पुतळ्याला मुख्यमंत्री शिंदे यांनी पुष्पहार घातला. या वेळी माजी खासदार प्रा. गायकवाड, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार, सुनील माने, निखील वाघ, संदिप चौगुले आदींनी मुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार केला.

दरम्यान, लग्नपत्रिकेवर पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) प्रेषक होते. आजारी असल्याने ते येऊ शकले नाहीत. मात्र जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत विवाह समारंभासाठी पूर्णवेळ होते, मुख्यमंत्री शिंदे यांचा त्यांनी सत्कार केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या वेळी राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे, क्रीडामंत्री संजय बनसोडे, माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार अभिमन्यु पवार, शिक्षक आमदार विक्रम काळे, पदवीधर आमदार सतीश चव्हाण, आमदार सुरेश धस, माजी मंत्री बसवराज पाटील, प्रा. सुरेश बिराजदार, डॉ. सुभाष साबणे, संताजी चालुक्य, केशव उर्फ बाबा पाटील, विक्रम गायकवाड, चंद्रकांत बिराजदार, सुरज साळूंके, मोहन पणुरे, बळीराम सुरवसे, जग्गनाथ पाटील, सुधीर पाटील, अर्चना पाटील, वैशाली खराडे, जितेंद्र शिंदे, पद्माकरराव हराळकर, ज्योती चौगुले, रणधीर पवार, एम. ए. सुलतान, किरण गायकवाड, माऊली गायकवाड,  दिग्विजय शिंदे, संजय नाना गाढवे, दत्ता साळुंके, अनिल खोचरे, विजय वडदरे, अमर देशटवार, विवेक हराळकर यांच्यासह महाराष्ट्र-कर्नाटकातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

(Edited By: Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT