Eknath Shinde : शिंदेंचा ठाकरेंबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, 'शिवसेनेचं काहीही होऊ दे, मुख्यमंत्री...'

Uddhav Thackeray want CM Position : दाऊद आला, शकील आला पण मी कोणाच्या धमकीला घाबरत नाही.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : आम्हाला खोके घेतल्याचा आरोप करणाऱ्यांना कंटेनर लागतात, त्याचा साक्षीदार आहे, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. त्यांना शिवसेना पक्षापेक्षा मुख्यमंत्री पदाचीच लालसा होती, असे सांगत शिंदेंनी कोल्हापूर येथील शिवसेनेच्या महाअधिवेशनात मोठा गौप्यस्फोट केला. यामुळे शिंदे विरुद्ध ठाकरे हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

भाजप-शिवसेनेने निवडणूक जिंकल्यानंतर 2019 मध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदाचा अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठेवला. त्यास नकार दिल्यानंतर युती तुटली आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ऐकले असते तर आज मी मुख्यमंत्री झालो नसतो, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले. या वेळी शिंदेंनी ठाकरेंना मुख्यमंत्री पदच हवे असल्याचे सांगून खळबळ उडवून दिली.

Eknath Shinde
Political News : अशोक चव्हाण, देवरांनंतर राज्यातील 'हे' नेतेही महायुतीच्या उंबरठ्यावर ! कुणाच्या गुप्त भेटी तर...

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, राज्यात 2019 मध्ये झालेली चूक सुधारू, असे सांगत त्यांना युती करण्याची विनंती केली होती. त्यावेळी युती झाली असती तर मी मुख्यमंत्री झालो नसतो. मी पाच वेळा त्यांना सांगितले की आपण युती केली पाहिजे. शेवटी मला ते म्हणाले, पुढील जी काय अडीच-तीन वर्षे आहेत, ती आपल्याला मिळाली पाहिजेत. पाच वर्षे मुख्यमंत्री पद मिळाले पाहिजे. शिवसेनेचे काहीही होऊ दे. असा नेता मी कधीच पाहिला नाही, असा टोलाही शिंदेंनी ठाकरेंना लगावला.

Eknath Shinde
Imtiyaz Jaleel : इम्तियाज जलील यांना MIM अंतर्गतच विरोध; छत्रपती संभाजीनगरमध्ये चाललंय तरी काय?

दाऊद आला, शकील आला...

त्यांनी सांगितले की, जेव्हा मी गडचिरोलीत काम करत होतो, तेव्हा पोलिस बोलले आपल्याला मायनिंगचे काम करता येणार नाही. मी बोललो नक्षलवाद (Naxal) मोठे की सरकार मोठे? कारखाना चालू केला. 10 हजार लोकांना रोजगार मिळाला. आणखी प्रोजेक्ट घेतले असून, हजारो रोजगार मिळतील. मी कधीच कोणाला घाबरत नाही. दाऊद आला, शकील आला पण मी कोणाच्या धमकीला घाबरत नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तुमची जीभ कचरते

शिवसेनेचे हिंदुत्व व्यापक आहे. आता हिंदुहृदयसम्राट बोलायला तुमची जीभ का कचरते? काँग्रेसला लांब ठेवायला बाळासाहेब बोलले होते, पण हे तर काँग्रेसला मांडीवर घेऊन बसले. शिवसेना (Shivsena) वाचवण्यासाठी हे धाडस आम्ही केले. शिवसैनिकांचे खच्चीकरण होऊ लागले, त्यामुळे आम्ही हे पाऊल उचलले. मी मनमोकळेपणाने सर्व सोडले असते. मी कधीही कोणते पद मागितले नाही.

संपूर्ण महाराष्ट्र कुटुंब

आता संपूर्ण महाराष्ट्र माझे कुटुंब आहे. माझं कुटुंब माझं घर असं माझं नाही. माझे कार्यकर्ते आणि राज्याची जनता माझे टाॅनिक आहे. हेच लोक माझे कवच कुंडले आहेत. मारने वाले से बडा बचानेवाला होता है, असेही ते म्हणाले.

(Edited by Sunil Dhumal)

R

Eknath Shinde
Rohit Pawar On Ajit Pawar : अजितदादा भावनिक होतील असं वाटलं नव्हतं; पवार विरुद्ध पवार संघर्ष दुर्दैवी; रोहित पवारांची टीका!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com