Eknath Shinde, Devendra Fadnavis, Pankaja Munde
Eknath Shinde, Devendra Fadnavis, Pankaja Munde  Sarkarnama
मराठवाडा

Beed News : एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे येणार एकाच व्यासपीठावर?

सरकारनामा ब्यूरों

Beed News : गहिनीनाथ गडावर संत वामनभाऊ महाराज यांच्या ४७ व्या पुण्यतिथीनिमित्त उद्या (दि. १५) आयोजित कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे उपस्थित राहणार आहेत.

तसेच यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे या देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, भाजप नेत्या पंकजा मुंडे हे एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे.

१ जानेवारीला विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या स्मृतीपित्यर्थ आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी फडणवीसांनी हजेरी लावली होती. मात्र यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि खासदार प्रीतम मुंडे या कार्यक्रमामध्ये दिसल्या नव्हत्या. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं होतं.

त्यानंतर आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे बीड दौऱ्यावर आहेत. त्यामुळे भाजप नेत्या पंकजा मुंडे या उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येणार असल्याने गडाच्या परिसरात हेलिपॅड देखील उभारण्यात आले आहे.

दरम्यान, गडाच्या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी अनेक भाविक गडावर पोहचले असून राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT