Ashok Chavan : कुठल्या पक्षात जायचं, की तिथचं राहायचं, हे पंकजांनी ठरवावं..

Pankaja Munde : राज्याचे व देशाचे राजकारण आणि त्याची परिस्थिती काय आहे? याची त्यांना चांगली जाण आहे.
Ashok Chavan Reaction On Pankaja Munde News, Aurangabad
Ashok Chavan Reaction On Pankaja Munde News, AurangabadSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Politics : पंकजा मुंडे या राज्यातील मोठ्या नेत्या आहेत, त्यांचे काम मी अनेकदा सभागृहामध्ये पाहिले आहे. त्यामुळे त्यांनी कोणत्या पक्षात जावं, की तिथेच राहावं याचा निर्णय घ्यायला त्या सक्षम आहेत. त्याविषयावर मी बोलणे योग्य ठरणार नाही. कुठल्या घोड्यावर बसलं की फायदा होईल, याचा विचार करून त्या निर्णय घेतील, अशा शब्दात (Congress) काॅंग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पंकजा मुंडे यांना शिवसेनेकडून देण्यात आलेल्या पक्ष प्रेवशाच्या आॅफरवर मत व्यक्त केले.

Ashok Chavan Reaction On Pankaja Munde News, Aurangabad
Fitness News : रावसाहेब दानवे राजकारणात हीट, तब्येतही फीट..

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा आहेत. नुकतीच शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना पक्षात येण्याची आॅफर दिली होती. पंकजा यांना भाजपमध्ये सातत्याने डावलले जात असल्याचा संदर्भ देत खैरेंनी ही आॅफर दिली होती. (Pankaja Munde) पंकजा मुंडे यांना पक्षाकडून डावलले जात असल्याची चर्चा गेल्या तीन वर्षापासून सुरू आहे.

विशेषतः परळी विधानसभा मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला तेव्हापासून घडलेल्या घडामोडी पाहता पंकजा समर्थकांची देखील तीच भावना झाली आहे. त्यामुळे पंकजा नाराज असल्याच्या चर्चा असल्या की त्यांना विविध पक्षांकडून आॅफर देखील दिल्या जातात. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी देखील नुकतीच अशी आॅफर पंकजा यांना दिली होती.

यावर औरंगाबादेत असलेल्या अशोक चव्हाणांना विचारले असता, त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, पंकजा मुंडे या सक्षम नेत्या आहेत, राज्याचे व देशाचे राजकारण आणि त्याची परिस्थिती काय आहे? याची त्यांना चांगली जाण आहे. त्यामुळे कुठल्या पक्षात जायचं की आहे तिथेच राहायचं याचा योग्य निर्णय त्या घेवू शकतात, त्यावर मी अधिक भाष्य करणे योग्य ठरणार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com