CM Eknath Shinde Sarkarnama
मराठवाडा

CM Eknath Shinde News : `लाडकी बहीण` योजनेतून फक्त जनतेचे प्रेम मिळवायचयं..

Chief Minister Eknath Shinde says, people's love must be won through Ladaki Bahin Yojana : आमची नियत साफ आहे, म्हणून आम्ही आॅक्टोबर, नोव्हेंबरचे पैसे अॅडव्हान्स दिले. आमची देण्याची वृत्ती आहे, सावत्र भाऊ आचारसंहितेचा बाऊ करतील, म्हणून अॅडव्हान्स पैसे दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

Jagdish Pansare

CM Ladki Bahin Yojana News : विरोधक `लाडकी बहीण` योजनेवर टीका करतात. ही योजना दोन महिन्यांनी बंद होणार असे सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण लाडकी बहीण योजना कोणताही हेतू, स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून आणलेली नाही. या योजनेतून आम्हाला काय मिळवायचयं? तर जनतेचे प्रेम, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना सुनावले. कोणी मायचा लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, आम्ही ती करू देणार नाही, असेही शिंदे यांनी ठणकावून सांगितले.

नांदेड येथील मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विरोधकांवर तोफ डागली. ही योजना किती गरजेची होती, हे तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून लक्षात येत. या योजनेने मला दोन कोटी तीस लाख बहीणी दिल्या. हा भाऊ तुम्हाला माहेरचा आहेर कायमस्वरुपी देणार. सावत्र भावांनी योजनेत खोडा घातला, बदनामी केली. पण पैसे मिळाल्यानंतर आता त्यांची भाषा बदलली आहे.

आमची नियत साफ आहे, म्हणून आम्ही आॅक्टोबर, नोव्हेंबरचे पैसे अॅडव्हान्स दिले. आमची देण्याची वृत्ती आहे, सावत्र भाऊ आचारसंहितेचा बाऊ करतील, म्हणून अॅडव्हान्स पैसे दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितले. योजनेच्या विरोधात उच्च न्यायालयात गेले, पण कोर्टाने यांच्या थोबाडीत देऊन हाकलून दिले. आता पुन्हा वडपल्लीवार नावाचा काँग्रसेचा माणूस नागपूर कोर्टात योजनेच्या विरोधात गेला आहे.

उद्धव ठाकरे म्हणतात आमच सरकार आलं की योजना बंद करू, अधिकाऱ्यांना तुरुगांत टाकू. पण माझ्या लाडक्या बहिणी तुम्हाला सत्तेवर येऊ देतील का? आम्ही चोरी केली का? पाप केल का? सरकारला जितके बळ द्याल तितके (CM Ladki Bahin Yojana) लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढतील. माझ्या बहिणींकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना फाशी दिली जाईल, असे सांगत सुरक्षित बहीण योजना आणा या विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले.

चुकीला माफी नाही, हे आम्ही उगीच म्हणत नाही. बदलापूर अत्याचार घटनेतील आरोपीने पोलिसांवर हल्ला केल्यावर त्यांनी बघत बसायचे का? त्यांच्याजवळ असलेल्या पिस्तूल कशासाठी आहेत? पोलिसांनी केलं ते बरोबर केले ना, असा सवाल एकनाथ शिंदे यांनी मेळाव्याला उपस्थितीत महिलांना केला.

आमच्या कामाची तुलना करा अन् मग होऊन जाऊ द्या हिशोब, असे म्हणत महाविकास आघाडी सरकारची अडीच वर्ष आणि महायुती सरकारने दोन सव्वा दोन वर्षात केलेल्या कामाची तुलना करा आणि आम्हाला पोच पावतीच्या रुपाने आशिर्वाद द्या, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT