Sanjay Shirsat-Imtiaz Jaleel News Sarkarnama
मराठवाडा

Imtiaz Jaleel On Sanjay Shirsat : मोठ्या उद्योगपतीच्या घशात सिडकोची जमीन घालण्यासाठीच शिरसाटांना सिडकोचे अध्यक्ष केले!

Imtiaz Jaleel alleges that Eknath Shinde appointed Sanjay Shirsat as chairman only to hand over CIDCO land to a major industrialist. : सिडकोच्या अधिकाऱ्यांनी सत्य काय ते सांगून टाकावे? अन्यथा ते ही अडचणीत येतील, असा इशाराही इम्तियाज यांनी आपल्या पोस्टमधून दिला आहे.

Jagdish Pansare

Aimim News : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सिडकोच्या जमीनीचा तब्बल पाच हजार कोटींचा घोटाळ्या केल्याचा नवा आरोप केला. पत्रकार परिषद घेत रोहित पवार यांनी संजय शिरसाट यांच्यावर कारवाईची मागणी केली. यावरून राजकारण तापत असतानाच या वादात एमआयएमचे माजी खासदार प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी उडी घेतली आहे.

इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी 'एक्स'वर प्रतिक्रिया देताना एका मोठ्या उद्योगपतीची या जमिनीवर नजर असल्याने हा प्रश्न सोडवण्यासाठी संजय शिरसाट यांना एकनाथ शिंदे यांनी सिडकोचे अध्यक्ष बनवले. सिडकोच्या प्रत्येक वरिष्ठ अधिकाऱ्याचा या जमीन देण्याला आक्षेप होता पण संजय शिरसाट यांनी दादागिरी करत बैठकीत स्पष्टपणे सांगितले की हे काम कोणत्याही किंमतीत व्हायला हवे! सिडकोने उघडपणे फाईलवरील नोटिंग्ज दाखवायला हव्यात अन्यथा तेही अडचणीत येतील, असा इशारा इम्तियाज जलील यांनी दिला आहे.

इम्तियाज जलील यांनी दोन महिन्यापुर्वी संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या बेकायदा मालमत्ता, एमआयडीसीतील प्लाॅट, जमीन खरेदीचे प्रकरण बाहेर काढले होते. जाहीर पत्रकार परिषद घेऊन इम्तियाज यांनी पुराव्यासह शिरसाट यांच्यावर आरोप केले. एवढेच नाही तर हे सगळे पुरावे अॅन्टीकरप्शन ब्युरो, ईडी, इनकम टॅक्स विभागाकडे देत कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर समाज कल्याण विभागात दीड हजार कोटींचा टेंडर घोटाळा झाल्याचा आरोपही इम्तियाज यांनी केला होता.

त्यानंतर आता रोहित पवार यांनी संजय शिरसाट यांनी सिडकोच्या जमीनीत पाच हजार कोटींचा घोटाळा केल्याचा दावा केल्यानंतर या संदर्भात इम्तियाज जलील यांनी काही दावे केले. त्यानूसार तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच सिडकोची जमीन एका मोठ्या उद्योगपतीच्या घशात घालण्यासाठीच संजय शिरसाट यांना सिडकोच्या अध्यक्षपदावर नेमले होते, असा दावा केला आहे. सिडकोच्या अधिकाऱ्यांनी सत्य काय ते सांगून टाकावे? अन्यथा ते ही अडचणीत येतील, असा इशाराही इम्तियाज यांनी आपल्या पोस्टमधून दिला आहे.

काय आहे प्रकरण?

आमदार रोहित पवार यांनी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यावर 5 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. संजय शिरसाट यांनी 5 हजार कोटी रुपयांची 150 एकर जमीन नवी मुंबईतील बिवलकर कुटुंबाला दिली. 2024 साली सिडकोचे अध्यक्ष होताच संजय शिरसाट यांनी बिवलकर कुटुंबाला जमीन देण्याच्या आदेशावर सही केल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

मराठा साम्राज्यासोबत गद्दारी करणाऱ्या बिवलकर कुटुंबाला जमीन देऊन संजय शिरसाट यांनी स्थानिक भूमीपुत्रांशी गद्दारी केली आहे. इंग्रजांशी हातमिळवणी करणाऱ्या व्यक्तीशी हातमिळवणी संजय शिरसाट यांनी केली आहे. त्यामुळे त्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणी देखील रोहित पवार यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी स्पेशल टास्कफोर्स नेमावी किंवा निवृत न्यायाधिशांच्या मार्फत चौकशी करावी, असे देखील त्यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT