Abhijeet Dipke: कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांचा एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यात एका पोलीस अधिकाऱ्यांवर ते चांगलेच संतापले दिसत आहेत. दिपके यांना छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी भेटायला येणाऱ्यांना संबंधित अधिकारी मज्जाव करत होते. हे कळताच घरात असलेल्या अभिजीत दिपके यांनी खाली येऊन त्या पोलीस अधिकाऱ्याला खडसावलं आणि थेट बाहेर जाण्यास सांगितलं.
"मी कोणाला भेटायचे हे पोलीस नाही ठरवणार", अशा शब्दांत खडसावत बंदोबस्तावर असलेल्या साध्या वेशातील पोलीस अधिकाऱ्याला अभिजीत दिपकेंनी घराबाहेर काढल्याने वातावरण तापले होते. दिल्लीच्या जंतर-मंतरवर सीजेपीच्या यशस्वी आंदोलनानंतर छत्रपती संभाजीनगरमधील बजाजनगर येथील अभिजित दिपके यांच्या निवासस्थानी भेटीसाठी नागरिकांची गर्दी वाढते आहे. सीजेपीच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची दोन दिवसीय बैठक काल पार पडली.
या दरम्यान, गुजरामधून आलेल्या पक्षाच्या दोन कार्यकर्त्यांनी आम्हाला बैठकीत का बोलावले नाही? असे म्हणत गोंधळ घातला होता. दिपके यांच्या घरासमोरच त्यांनी आंदोलन सुरू केले होते. पोलीसांनी या दोन आंदोलकांना ताब्यात घेतले होते. या पार्श्वभूमीवर अभिजीत दिपके यांना भेटण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.
आज वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यातील एक पोलीस अधिकारी दिपके यांच्या निवासस्थानी बंदोबस्तावर आले होते. दिपके यांना भेटण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाची चौकशी करून ते त्यांना भेटण्यापासून रोखत होते. हा प्रकार आपल्या घराच्या वरच्या मजल्यावर असलेल्या अभिजीत दिपके यांना समजला आणि ते खाली येऊन त्या पोलीस अधिकार्यावर संतापले. "मी कोणाला भेटायचे हे मी ठरवणार, पोलीस नाही. मला भेटण्यासाठी येणाऱ्या लोकांना अडवणारे तुम्ही कोण? तुमचे नाव काय? कोणत्या पोलीस स्टेशनमधून आलात, मी सीपी साहेबांशी बोलतो. मला भेटायला येणाऱ्यांना रोखणारे तुम्ही कोण?" असे म्हणत दिपके यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यालाच घराबाहेर काढले.
मी तुम्हाला इथे याआधी कधीच पाहिले नाही, तुम्ही माझ्या घरात येऊ नका, अशा शब्दात दिपके यांनी त्या अधिकाऱ्याला सुनावले. तसेच या अधिकाऱ्याची तक्रार देखील केली. सोशल मीडियावर अभिजीत दिपके यांचा आणि पोलीस अधिकाऱ्यामध्ये झालेल्या वादाचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या वादानंतर दिपके यांनी पोलीस उपायुक्तांना फोन केला. फोनवर अधिकाऱ्याची तक्रार केली. हा अधिकारी मला इथं नकोय, असं पोलीस उपायुक्तांना सांगत विनंती केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.