Shivsena News : एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या 6 खासदारांसाठी PM मोदींची 'हॉटलाईन'; ब्रेकफास्ट बैठकीत मोठा संदेश

Delhi meeting News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत विविध विषयावर चर्चा झाली. शिवसेनेच्या सहा खासदारांनी भेट घेऊन त्यांच्यासोबत ब्रेकफास्ट घेतला.
pm modi, mp shivsena
pm modi, mp shivsenaSarkarnama
Published on
Updated on

Shivsena News : शिवसेनेत नव्याने प्रवेश केलेल्या सहा खासदारांसह उपमुख्यमंत्री एकनात शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे आणि खासदार ज्योती वाघमारे याही उपस्थित होत्या. या भेटीबाबत माहिती देताना एकनाथ शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत विविध विषयावर चर्चा झाली. शिवसेनेच्या सहा खासदारांनी भेट घेऊन त्यांच्यासोबत ब्रेकफास्ट घेतला. यावेळी त्यांच्यासोबत राज्याच्या विकासाबाबत चर्चा केली.

याशिवाय एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान मोदी यांचीही स्वतंत्र बैठक झाल्याची माहिती आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास एक तास चर्चा झाली. या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला. युवा वर्ग हेच देशाचे भविष्य आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने युवा वर्गाशी संवाद साधत आहेत. केंद्र सरकारने विरोधकांसोबत चर्चेला तयार असल्याचे सांगितले आहे. मात्र, विरोधकांना राजकारण करायच असल्याची टीकाही यावेळी त्यांनी केली.

पंतप्रधान मोदी यांच्यासोबत पार पडलेल्या या ब्रेकफास्ट बैठकीत मतदारसंघात कोणतीही विकासकामे प्रलंबित असतील किंवा केंद्र सरकारशी संबंधित कामांसाठी अडचणी येत असतील, तर थेट पंतप्रधान कार्यालयाशी संवाद साधा, त्याशिवाय येत्या काळात मतदारसंघातील विकास कामांना गती द्या, सत्तेचा उपयोग करून जनतेची कामे मार्गी लावा, अशा सूचना मोदींनी या खासदारांना दिल्याचेही यावेळी शिंदे यांनी स्पष्ट केले.

pm modi, mp shivsena
PM Modi-Sharad Pawar : दिल्लीत घडामोडींना वेग; PM मोदी अन् शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या तातडीच्या भेटीनं राजकारण तापलं

पीएम मोदी यांनी नीटच्या बाबतीत चर्चा केली. संसदेचे अधिवेशन सुरु असतानाच हा प्रश्न सोडवला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा राजीनामा मागणे करणे म्हणजे निव्वळ राजकारण आहे. राजीनामा मागण्याचे विरोधकांचे नाटक आहे. दहशतवाद संपवण्यामध्ये अमित शाह यांचा सिहांचा वाटा आहे. शाह संसदेत बोलतील त्यावेळी विरोधक पळून जातील, असेही शिंदे म्हणाले.

pm modi, mp shivsena
Narendra Modi advises : पीएम मोदींसोबत शिवसेनेच्या सहा खासदारांची 'ब्रेकफास्ट डिप्लोमसी'; ओम राजेनिंबाळकरांकडून घेतली खास माहिती, दिला मोठा शब्द!

उद्धव ठाकरे यांनी त्यांचा कोर्टावर विश्वास आहे की नाही ठरवले पाहिजे. शिवसेना पक्ष व चिन्ह सुनावणी सुरु आहे. हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. त्यामुळे त्यावर जास्त बोलणे उचित ठरणार नाही. जनतेने आम्हाला पूर्ण पाठींबा दिला आहे. जनतेच्या न्यायालयाने आम्हाला स्वीकारले असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com