Eknath Shinde and Aaji.jpg Sarkarnama
मराठवाडा

CM Eknath Shinde : 75 वर्षांच्या आजीबाईंनी 2 वर्षांनंतर पुन्हा मुख्यमंत्री शिंदेंचं मन जिंकलं, 50 रुपयांची नोट...

Deepak Kulkarni

नवनाथ इधाटे

Sillod News : शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदेंसह 40 आमदारांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली.यानंतर कोणाच्या मनी ध्यानी नसताना शिंदेंच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली. यानंतर शिंदेंनी पहिला दौरा हा छत्रपती संभाजीनगर मधील सिल्लोडचा दौरा केला होता. या घटनेला आता दोन वर्ष उलटून गेले आहेत. पण त्या दौऱ्याची आठवण आज एका आजींबाईंमुळे पुन्हा एकदा ताजी झाली. या आठवणीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनाही सुखद धक्का दिला.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात राहणार्या 75 वर्षीय आजी सुभद्राबाई कचरू पगारे यांनी 1 ऑगस्ट 2022 रोजी पाल फाटा येथे मुख्यमंत्र्याच्या तोंडावर हात फिरवत 'मव्हा वाघ मुख्यमंत्री झाला' म्हणून कौतुक केले होते. त्यावेळी शिंदेंनी पन्नास रुपयांची नोट या वयोवृद्ध आजीला दिली होती.

दोन वर्षांनंतर या आजीने शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले असल्याने पुन्हा पाल फाट्यावर येऊन पन्नास रुपयाची नोट दाखवली.मी दोन वर्षांपासून ही नोट जपून ठेवली असल्याची माहिती सुभद्राबाई या वयोवृद्ध आजींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुक्रवारी (ता.2) सांगितले.

शिवसेनेमधून एकनाथ शिंदे यांचा गट बाहेर पडल्यानंतर प्रथमच शिवसेनेचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले होते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री (Chief Minister) झाल्यानंतर त्यांनी सिल्लोड दौरा केला होता.त्यावेळी पाल फाटा येथे फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या वतीने किशोर बलांडे यांनी जाहीर सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या सत्कार समारंभात 75 वर्षीय आजी सुभद्राबाई पगारे यांनी " मव्हा वाघ मुख्यमंत्री झाला म्हणून तोंडावून हात फिरवित एक ऑगस्ट 2022 रोजी कौतुक केले होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजीचा आशीर्वाद घेऊन आजीला पन्नास रुपयाची नोट दिली होती.

या घटनेला दोन वर्षांचा कालावधी उलटला असला तरी सुभद्राबाई पगारे यांनी शुक्रवारी जुन्या आठवणीला उजळा देत दोन वर्षांपूर्वी दिलेली 50 रुपयांची नोट जतन करून ठेवली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितले. त्यावेळी शिंदेंना मोठा सुखद धक्का बसला.त्यांनी आजीचा आशीर्वाद घेतला. यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार,माजी सभापती किशोर बलांडे, रमेश इधाटे यांच्यासह अनेकजण उपस्थिती होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT