Abhijeet Patil : अभिजीत पाटलांचे भालके अन्‌ बबनदादांना चॅलेंज; म्हणाले, ‘अभिजीतची त्यांना भीती वाटू लागलीय’

Assembly Election 2024 : छत्रपती शिवाजी महाराजांनीही पुरंदरचा तह केला होता. त्या रणनीतीनुसार पुढीचे निर्णय आपल्याला घ्यायचे आहेत. पुढील चार महिन्यांत मी आमदार होईल, त्यासाठी पुढच्या वर्षीची वाट पाहायची काय गरज आहे.
Bhagirath Bhalke- Abhijeet Patil-Babanrao Shinde
Bhagirath Bhalke- Abhijeet Patil-Babanrao ShindeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 02 August : मला काही जण विचारत आहेत की, तुम्ही कोणाकडून उभे राहणार आहात. पण, मला एक सांगायचं आहे की, जे आता इकडं (पंढरपूर-मंगळवेढा) उभारणार आहेत, त्यांना महाविकास आघाडीचं तिकिट मिळेल की नाही, हे माहिती नाही. तिकडचे (माढा) आता आपण उभं राहायचं की पोराला उभं करायचं, या विचारात आहेत.

अभिजीत असेल तर त्यांना आता भीती वाटू लागली आहे, अशा शब्दांत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी आमदार बबनराव शिंदे आणि भगीरथ भालके यांना टोमणा मारला.

पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने समर्थकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. जेसीबीच्या साहाय्याने अभिजीत पाटील यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. विधानसभेचा आकार असलेला केक कापण्यात आला. त्यानंतर झालेल्या सभेत बोलताना अभिजीत पाटील यांनी भालके आणि शिंदे यांना खुले आव्हान दिले.

छत्रपती शिवाजी महाराजांनीही पुरंदरचा तह केला होता. त्या रणनीतीनुसार पुढीचे निर्णय आपल्याला घ्यायचे आहेत. पुढील चार महिन्यांत मी आमदार होईल, त्यासाठी पुढच्या वर्षीची वाट पाहायची काय गरज आहे. मला काही जण विचारतात की तुम्ही कोणाकडून (महायुती की महाविकास आघाडी) विधानसभा निवडणुकीला (Assembly Election) उभे राहणार आहात.

Bhagirath Bhalke- Abhijeet Patil-Babanrao Shinde
Praveen Mane : अजितदादांना पुण्यातच मोठा धक्का; इंदापूरचा युवा नेता शरद पवार गटात प्रवेश करणार

पण, मला एक सांगायचं आहे की, जे आता इकडं (महाविकास आघाडीकडून पंढरपूर) उभारणार आहेत, त्यांना तिकिट मिळेल की नाही, हे माहिती नाही. तिकडचे (महायुती, माढा) आता आपण उभं राहायचं की पोराला उभं करायचं, या विचारात आहेत. अभिजीत असेल तर ते भिऊ लागले आहेत, असा दावाही अभिजीत पाटील यांनी केला.

आपली दोन वर्षांतील पार्टी आणि आपण दोन्हीकडं भीती दाखवायला लागलो आहे. सर्वसामान्यांच्या पाठिंब्यामुळे आपल्याला ही ताकद मिळाली आहे. आपण तसा संघर्ष केला आहे. तुमच्या पाठिंब्यामुळे मला संघर्ष करायला बळ मिळतंय.

Bhagirath Bhalke- Abhijeet Patil-Babanrao Shinde
Kolhapur Toll : कोल्हापूरचा टोल हे सतेज पाटलांचेच पाप; टोलप्रश्नी आंदोलनाचा इशारा देणाऱ्या काँग्रेसला भाजप नेत्याचा टोला

आपलं तत्व ठरलं नसल्यामुळेच सर्व पक्षांतील नेतेमंडळींना त्यांचं धोरण ठरवता येत नाही. ज्या वेळी आपलं धोरण ठरेल, त्याचवेळी त्यांचं ठरणार आहे. आपलं मतदारसंघाबाबतचे धोरण हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याप्रमाणे ठरवू या आणि उद्याची विधानसभेची लढाई जिंकूया, असेही अभिजीत पाटील यांनी नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com