CM Eknath Shinde News Sarkarnama
मराठवाडा

CM Eknath Shinde Tour At Jalna : मुख्यमंत्र्यांच्या जरांगे भेटीचा दौरा रद्द ? की मग गनिमीकावा..

Maratha Reservation News : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येणार म्हणून मोठी गर्दी झाली, आंदोलनकर्त्यांच्या नजराही तिकडे लागल्या होत्या.

Jagdish Pansare

Jalna Maratha Protest News : अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला भेट देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार येणार होते. (Antarwali Sarati News) त्यांचा अधिकृत दौराही आला होता. मात्र त्याआधीच मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत आपण जाणार नाही , तर आज आमचे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी जाणार आहे. त्यानंतर मी पुढचा निर्णय घेईन, असे सांगत शिंदे यांनी संभ्रम वाढवला.

इकडे अंतरवाली सराटीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येणार म्हणून मोठी गर्दी झाली, आंदोलनकर्त्यांच्या नजराही तिकडे लागल्या होत्या. (Maratha Reservation) प्रसार माध्यमांनी ट्रायपाॅड लावून कॅमेरे सज्ज केले. पण अधिकृत वेळ जवळ आली तरी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याबाबत काहीच हालचाली झाल्या नाहीत.

चिकलठाणा विमानतळावरही पोलिसांचा बंदोबस्त, स्काॅड तैनात होते. (Jalna) दरम्यान, मुख्यमंत्री (Eknath Shinde) जरांगेंच्या भेटीला जाणार नाहीत, त्याऐवजी आजही सरकारचे शिष्टमंडळ जरांगे यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याच्या बातम्या माध्यमांवर झळकल्या.

त्यामळे नेमकं काय झालं, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा दौरा आलेला असतांना अचानक तो रद्द झाला का? की मग गनिमकाव्याचा हा एक भाग आहे? अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक यांच्यासह, प्रोटोकाॅल दौऱ्यातील विशेष कार्य अधिकारी यांच्याशी दौऱ्या संदर्भात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडूनही कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT